Thursday, March 27, 2025
---Advertisement---
---Advertisement---

ब्रेकिंग : महिलांचे हाफ तिकीट बंद होणार ? परिवहन मंत्री काय म्हणाले वाचा !

ST women 50 percent Discount : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांना एसटी प्रवासात ५०% सवलत आणि जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देण्याचा मोठा निर्णय घेतला होता. या सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यात जात असल्याचा आरोप होत असतानाही सरकारने तो फेटाळला होता. मात्र, आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी स्पष्ट कबुली दिली आहे.

---Advertisement---

सवलतीमुळे एसटी महामंडळ तोट्यात (ST Discount)

धाराशिव येथे ‘व्हाईस ऑफ मीडिया’ या कार्यक्रमात पत्रकारांनी एसटी प्रवासात पत्रकारांसाठी सवलतीची मागणी केली असता, मंत्री सरनाईक यांनी “महिला आणि जेष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात गेली आहे, त्यामुळे आणखी कोणालाही सवलत देता येणार नाही” असे स्पष्ट केले.

तसेच महिलांना आणि जेष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतीमुळे एसटीला दररोज ३ कोटी रुपयांचा तोटा होत असल्याचे सांगितले. त्यामुळे आणखी कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. (ST Discount)

---Advertisement---

महायुती सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी टीका केली असून, “निवडणुकीच्या तोंडावर लोकांना आश्वासने देऊन निवडणूक जिंकल्यानंतर तेच सरकार त्यांना दिलेल्या सवलती काढून घेत आहे” असे म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

परिवहन मंत्र्यांनी मात्र “सर्वांसाठी सवलती देत राहिलो, तर एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल. यापेक्षा गावखेड्यापर्यंत एसटी सेवा पोहोचवण्यावर भर दिला जाईल” असे स्पष्ट केले आहे.

हे ही वाचा :

LIC ची स्मार्ट पेन्शन योजना ; एकदाच गुंतवणूक करा आणि आजीवन पेन्शन मिळवा!

‘छावा’ चित्रपट 7 दिवस मोफत दाखवला जाणार, वाचा कुठे पाहता येणार ?

महिलांसाठी कॅन्सर प्रतिबंधक लस पाच ते सहा महिन्यांत उपलब्ध होणार

छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट होणार जागतिक वारसास्थळ

धक्कादायक : इंधनात ८०% पाणी २०% पेट्रोल मिसळून विक्री

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles