पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – शाहूनगर, चिंचवड येथील कै. कैलासभाऊ चांदगुडे प्रतिष्ठान, आधार महिला मंडळ संस्थापक अध्यक्षा सुप्रिया चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी शिवजयंती निमित्त भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. (PCMC)
सकाळी 6 वा सिंहगडावरून शिवप्रेरणा ज्योत दौड आणि आगमन सकाळी 9 वा झाले. यामध्ये शाहूनगर परिसरातील तरुणाईने मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. छत्रपती शिवरायांची 95 फूट उंचीच्या प्रतिमेची ढोल ताशाच्या गजरात सायंकाळी मोठी मिरवणूक आयोजित करण्यात आली होती.
शाहूनगर, चिंचवड येथील या महामिरवणुकीत मोठ्या प्रमाणात माता भगिनी, नागरिकांनी सहभाग नोंदवला. (PCMC)
यावेळी आमदार अमित गोरखे, माजी उपमहापौर तुषार हिंगे, माजी उपमहापौर केशव घोळवे, कैलास दुर्गे, नितीन चव्हाण, अरविद गोखले, संदीप पोलकम, शैलेश वांजरे, महेश चांदगुडे, माजी नगरसेवक बाळासाहेब जगताप, रमेश जाधव, ओमकार चांदगुडे आदी मान्यवरांनी मिरवणुकीत सामील होऊन शिवरायांना अभिवादन केले.


या शिवजयंती उत्सवाचे आयोजन संयोजन सुप्रिया चांदगुडे उपाध्यक्षा भाजप पिंपरी चिंचवड शहर व सर्व आधार महिला मंडळ सदस्या, रामदास जाधव, जेष्ठ नागरीक अध्यक्ष व सर्व जेष्ठ नागरीक संघ, महेशभाऊ चांदगुडे युवा मंच, शिवशंभो फाऊंडेशन, सावरकर मित्र मंडळ, महाबली प्रतिष्ठान, सेवा सारथी फाऊंडेशन, धर्मवीर संभाजीराजे युवा मंच, अष्टविनायक गणेश मंदिर, श्री साई मित्र मंडळ, राजश्री शाहू मित्र मंडल यांनी केले.