Saturday, September 28, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या स्वागतार्ह स्वाक्षरी मोहिम

PCMC : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या स्वागतार्ह स्वाक्षरी मोहिम

प्रा. कविता आल्हाट यांचा पुढाकार ; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद (PCMC)

योजना अखंडितपणे चालू ठेवण्याची महिलांची मागणी


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : माहिती शासनाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अखंडितपणे चालू राहावी अशी मागणी करतानाच या योजने बद्दल आभार मानण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. (PCMC)

या मोहिमेला देखील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघांमध्ये ही स्वाक्षरी मोहीम महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत राबविण्यात आली.

भोसरी मतदारसंघातील बोऱ्हाडेवाडी मोशी येथे प्रा. कविता आल्हाट, तसेच रोजगार व स्वयंरोजगार सेल प्रदेशाध्यक्ष मेघा पवार यांच्या वतीने स्वाक्षरी अभियान व मानवी साखळी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, डॉ. सुनिता मोरे, निरीक्षक शितल हगवणे ,ज्योती गोफणे, मनीषा गवळी, मेघा पळशीकर, जया गवळी, पुनम वाघ, रिजवाना सय्यद, प्रवीण पिल्ले, आशा मिसाळ व इतर पदाधिकारी तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी चाकणकर यांनी महिला, मुली व युवकांसाठी राज्य सरकार तर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली तसेच महिलांना मार्गदर्शन केले.

महिलांमध्ये योजना लोकप्रिय झाली आहे

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सर्व महिलांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे.समस्त महिला भगिनींकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या योजनेबद्दल आभार व्यक्त करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.

प्रा. कविता आल्हाट
शहराध्यक्ष, महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस

संबंधित लेख

लोकप्रिय