Monday, May 20, 2024
Homeताज्या बातम्याPCMC :जपानमध्ये विकास आणि संशोधन प्रस्तावांचे स्वागत - हिरोयुकी मात्सुमोतो

PCMC :जपानमध्ये विकास आणि संशोधन प्रस्तावांचे स्वागत – हिरोयुकी मात्सुमोतो

जपान टीएसके टोकियो सिस्टीम्स कैहात्सु कंपनी आणि पीसीसीओई मध्ये करार संपन्न

पिंपरी चिंचवड /क्रांतिकुमार कडुलकर :दि. २७ – जपान मध्ये सध्य स्थितीत कुशल अभियंत्याना करिअरच्या खूप संधी आहेत.जपानी भाषा शिकण्यासाठी पात्रत्ता म्हणून ग्राह्य धरली जाणारी जेएलपीटीएन ३ ही परीक्षा उत्तीर्ण करून विद्यार्थ्यांनी करिअरसाठी जपानची निवड करावी असे आवाहन हिरोयुकी मात्सुमोतो यांनी केले. 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट,पीसीसीओई आणि जपान मधील टीएसके टोकियो सिस्टीम्स कैहात्सु कंपनी लिमिटेड यांच्या मध्ये भारत आणि जपान कला, संस्कृती आणि भाषा आदान प्रदान सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी टीएसके टोकियो सिस्टीम्स कैहात्सु कंपनी लिमिटेडचे हिरोयुकी मात्सुमोतो, ताकेशी इबुसुकी, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले,कंपनीचे सल्लागार ताकेशी इबुसुकी,पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी,पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे,विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे,अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ.गिरीश देसाई,पीसीसीओईचे उपसंचालक डॉ.नीलकंठचोपडे,डीन ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डॉ. शितलकुमार रवंदळे, प्रा.गीतांजली झांबरे आदि उपस्थित होते.

मात्सुमोतो म्हणाले की, आमची कंपनी ही सायबर सुरक्षा प्रणाली, व्यावसायिक वाढीसाठी माहिती तंत्रज्ञान विकसन, कुशल मनुष्यबळ आदी क्षेत्रात कार्यरत आहे. रिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षेत्रात विद्यार्थ्यांना फंडिंग करण्यासाठी इच्छुक आहे. तसे प्रस्ताव आमच्या पर्यंत आल्यास आम्ही त्याचे स्वागत करू.
प्रोसिड टेक्नोलॉजीसचे संचालक समीर लघाटे, स्वाती भागवत यांनी जपान मधील करिअरच्या उज्ज्वल संधी याबाबत सादरीकरण केले.पीसीसीओई इंटरनॅशनल रिलेशन सेलच्या पुढाकाराने या माहिती आदान – प्रदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  स्वागत डॉ.गोविंद कुलकर्णी, प्रास्ताविक व आभार डॉ. रोशनी राऊत यांनी केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय