Saturday, May 18, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:ग्रामीण आदिवासी भागातील गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मदत करणार आहोत-प्रिती...

PCMC:ग्रामीण आदिवासी भागातील गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मदत करणार आहोत-प्रिती बोंडे

लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह ची DG visit व्हिजिट समारंभ रावेत येथे संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडूलकर:”लायन्स क्लब ही समाजासाठी वेगवेगळी सामाजिक, शैक्षणिक,आरोग्य विभागात विधायक काम करणारी संस्था हेच डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवून मागील वर्षभरात पुणे विशेषतः मावळच्या दुर्गम भागातील गरीब व मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील मुलामुलींना शैक्षणिक साहित्य देण्यात आले आहे.
यावर्षी खांडी,गोंठेवाडी,कळकाई या अति दुर्गम भागातील माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलींना सायकल्स देऊन त्यांच्या शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत,ग्रामीण भागातील गरीब मुला मुलींना शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात मदत करणार आहोत.असे लॉयन्स क्लब पिंपळे सौंदगरच्या अध्यक्षा प्रीती बोंडे यांनी रावेत येथे लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह ची DG visit व्हिजिट समारंभात सांगितले.


लायन्स क्लब ऑफ पिंपळे सौदागर ऍक्टिव्ह ची DG visit व्हिजिट 21/2/2024 रोजी हॉटेल कासा दि सिल्वर वाकड येथे धुमधडाकात संपन्न झाली.


डिस्ट्रिक्ट गव्हर्नर एमजेएफ लायन विजय भंडारी यांनी पिंपळे सौदागर युनिटच्याक्लबला भेट देऊन क्लब सदस्यांनी आतापर्यंत केलेल्या कामाचे भरभरून कौतुक केले.ज्या पद्धतीने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन विजय भंडारी यांनी सर्व क्लब मेंबर्स चे कौतुक केले. त्यामुळे येणार्‍या काळात जोमाने सामाजिक कार्य करण्यासाठी सर्वांना प्रेरणा मिळाली,सर्वांचे कौतुक केले

यावेळी अध्यक्ष प्रिती बोंडे म्हणाल्या की,
आमच्या क्लब मधील सर्वांचे सामाजिक काम करण्याची जिद्द ही द्विगुणित झाली आहे,मागील वर्षभरात प्रीती बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या क्लबच्या माध्यमातून आम्ही अनेक सामाजिक अ‍ॅक्टिव्हिटी करून जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचलो आहोत.


यावेळी DG Visit साठी कॅबिनेट सेक्रेटरी, कॅबिनेट ट्रेझरर, सीईओ, तसेच DG visit चेअरपर्सन,सर्व कॅबिनेट ऑफिसर्स,लायन MJF सुनील जाधव, DG visit चेअर पर्सन,RC लायन धनराज मंगलानी आणि ZC लायन दत्तात्रय सपकाळ,लायन दीपक सोनार, सेक्रेटरी लायन बालाजी जगताप,ट्रेझरर लायन धनंजय माने सर्व क्लबमधून उपस्थित असलेले प्रेसिडेंट सेक्रेटरी, ट्रेझरर, लायन विजय सारडा, लायन श्रेयस दीक्षित, तसेच आमंत्रित व निमंत्रित लायन्स नॉन लायन्स सभासद उपस्थित होते…आज सांगायला खूप छान वाटत की सर्वांकडून झालेले DG visit चे कौतुक भरभरून होत आहे..DG नी खूप छान गाणे म्हटले, क्लब मधील सर्व मेंबर्स सोबत डान्स सुद्धा केला, त्यांनी DG visit साठी खूप वेळ क्लब ला दिला. त्याबद्दल डिस्टिक गव्हर्नर लायन विजयजी यांचे मनापासून धन्यवाद,अश्या प्रकारे DG visit ही खूप छान पणे क्लब मधील सर्व सभासदांच्या सहकार्याने पूर्ण झाली.

अध्यक्षा लायन प्रिती बोंडे,लायन्स क्लब ऑफ़ पिंपळे सौदागर अ‍ॅक्टिव्ह व टीम सेक्रेटरी,लायन् बालाजी जगताप,ट्रेझरर लायन धनंजय माने यांनी या कार्यक्रमाचे उत्तम संयोजन केले.

यावेळीDG नी खूप छान गाणे म्हटले, क्लब मधील सर्व मेंबर्सनी लॉयन्स क्लबच्या सदस्या समवेत नृत्य करून सर्वांना टीमवर्क मोटिव्हेशन साठी प्रेरणा दिली.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय