पीसीईटी आयोजित दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : लवकरच लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यामध्ये तरुणांनी मतदार नोंदणी करून भरघोस मतदान करावे आणि लोकशाही सुदृढ करावी. ग्रामीण भागांमध्ये मतदानासाठी उत्साह असतो मात्र शहरात निरुत्साह दिसून येतो; ही नकारात्मक भावना दूर करून तरुणांनी आपल्यासह समाजातील सर्व घटकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, असे मत जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक कार्यालय, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय, निवडणूक साक्षरता मंडळ, पिंपरी चिंचवड महानगरपालिका,(pcmc) स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड, वर्शिप अर्थ फाउंडेशन, इन्फिनिटी ९०.४ एफ एम यांच्या संयुक्त सहकार्याने दोन दिवसीय युथ कॉन्फरन्सचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त विठ्ठल जोशी, उपायुक्त अण्णा बोदडे, वुईचे राज्य समन्वयक अल्ताफ पिरजादे, जिल्हा समन्वयक स्नेहल खानोलकर, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, एस. बी. पाटील मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, समन्वयक डॉ. केतन देसले आदी उपस्थित होते.
या दोन दिवसीय परिसंवादामध्ये लोकशाही सुदृढ करण्यासाठी युवकांचा सहभाग, लोकशाहीची मूल्ये समाजाच्या विकासामध्ये आणि निवडणुकीमध्ये माध्यमांचा सहभाग आणि महत्त्व, राष्ट्र उभारणीत तरुणांची भूमिका या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांशी संवाद तसेच विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थिती विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली. pcmc news
पुणे तिथे काय उणे असे म्हटले जाते. पण खेदाची बाब म्हणजे पुणेकर मतदान करण्यात उणे आहेत. सुशिक्षित भागात नागरिक मतदानाचा हक्क बजावत नाहीत, मग आपण सुशिक्षित कसे म्हणणार, हा प्रश्न आहे. निवडणुकीत अधिक मतदान होण्यासाठी निवडणूक आयोग अनेक उपक्रम राबवीत असून भरपूर काम करत आहे. त्याला नागरिकांनी प्रतिसाद देण्याची गरज आहे. मतदान न करता केवळ टीका टिप्पणी, समाज माध्यमातून व्यक्त होण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले.
आण्णा बोदडे, डॉ. गोविंद कुलकर्णी, अल्ताफ पिरजादे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान दुपारच्या सत्रात पुणे उपजिल्हाधिकारी व स्वीप च्या नोडल ऑफिसर अर्चना तांबे यांनी विद्यार्थ्यांशी मतदानाचे महत्त्व आणि तरुणांचा सहभाग या विषयावर संवाद साधला.
तसेच सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी देखील भारतीय लोकशाही आणि मतदान या विषयावर मार्गदर्शन केले. याबरोबरच ६ विद्यार्थी वक्त्यांनी आपले मत मांडले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू चे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास पीसीईटी सह पिंपरी चिंचवड (pcmc) शहरातील अन्य महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले. स्वागत डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी केले. आभार डॉ. केतन देसले यांनी मानले.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी जाहीर, वाचा कुणाकुणाला मिळाली उमेदवारी !
मोठी बातमी : भाजप खासदाराच्या सुनेचे गंभीर आरोप, माझा उपभोगाची वस्तू म्हणून वापर
प्रचारा दरम्यान भाजप उमेदवाराने घेतले महिलेचे चुंबन, व्हिडिओ व्हायरल
जुन्नर : बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू
हरिश्चंद्रगडावरून उडी मारून २२ वर्षीय तरूणीची आत्महत्या
ब्रेकिंग : नाना पटोलेंच्या अपघातानंतर आणखी एका आमदाराच्या गाडीचा अपघात, दोघांचा मृत्यू
माफीनामा घेऊन आलेल्या रामदेव बाबांना सर्वोच्च न्यायालायाने चांगलेच झापले, आम्ही आंधळे नाहीत
हृदयपिळून टाकणारी घटना ; मांजराला वाचवण्याच्या नादात एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
जुन्नर : ज्यूस, सरबतसाठी आणलेल्या बर्फाच्या लादीमध्ये मेलेला उंदीर आढळल्याची धक्कादायक घटना
मोठी बातमी : नाना पटोले यांचा भीषण अपघात, काँग्रेसचा भाजपवर गंभीर आरोप
ब्रेकिंग : मनसेचे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे यांचा राजीनामा, वाचा काय आहे कारण !