Friday, November 22, 2024
HomeNewsPCMC:असंघटित कष्टकरी आज अन्यायकारक जीवन जगत आहेत,त्यांना संघटित करणे ही कॉम्रेड गोविंद...

PCMC:असंघटित कष्टकरी आज अन्यायकारक जीवन जगत आहेत,त्यांना संघटित करणे ही कॉम्रेड गोविंद पानसरे याना श्रद्धांजली-क्रांतिकुमार कडुलकर

पिंपरी चिंचवड:कॉम्रेड गोविंदराव पानसरे हे विचार हे कष्टकऱ्यांचे नेते होते,त्यांनी नेहमी दीनदुबळ्या घटकांसाठी लढा दिला.कम्युनिस्ट व डाव्या,पुरोगामी विचारांची बांधिलकी आणि कष्टकरी असंघटित बहुसंख्य सामान्य जनतेच्या विचारांचे ते वैचारिक प्रबोधनकार होते.

‘शिवाजी कोण होता’ या सुप्रसिद्ध पुस्तकात त्यांनी शिवरायांचे खरे विचार लोकांसमोर सादर केले.हिंदू मुस्लिम वैरभावनेवर स्वार होऊन देशाच्या राजकारणाला अति कर्मठ उजव्या दिशेच्या प्रवाहात लोटणाऱ्या या कालखंडात असंघटित कामगार कष्टकरी आज अन्यायकारक जीवन जगत आहे,आर्थिक विषमतेच्या या काळात कष्टकऱ्यांना संघटित करण्यासाठी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन लढा देणारे कार्यकर्ते निर्माण व्हावेत,अशी श्रद्धांजली अर्पण करताना श्रमिक चळवळीतील कार्यकर्ते क्रांतिकुमार कडुलकर यांनी सांगितले.
कष्टकरी संघर्ष महासंघ आयोजित श्रद्धांजली सभेत ते बोलत होते.


कॉम्रेड गोविंदांना पानसरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे श्रमिक चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते समीक्षक क्रांती कुमार कडुलकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी कामगार नेते काशिनाथ नखाते,उपाध्यक्ष राजेश माने सलीम डांगे किरण साडेकर माधुरी जलमूलवार,राजेश शिंगारे,नंदा जाधव,अर्चना कांबळे,सिंधू जाधव,सपना शिंदे,राणी जाधव,महादेव गायकवाड आधीसह कष्टकरी बांधव उपस्थित होते.

संबंधित लेख

लोकप्रिय