आदिवासी उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड आयोजित धानोरी येथे शोभायात्रा (PCMC)
पिंपरी चिंचवड (क्रांतीकुमार कडुलकर) – क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी उत्सव समिती पुणे आणि पिंपरी चिंचवड यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (PCMC)
रविवारी (दि.२९ डिसेंबर) सकाळी दहा वाजता, धानोरी पुणे येथील चैतन्य गगनगिरी कार्यालय येथे या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजता धानोरी येथील आदिवासी भीमाशंकर तरुण मित्र मंडळ, मुंजाबा वस्ती येथून चैतन्य गगनगिरी मंगल कार्यालयापर्यंत भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजन समिती सदस्य विठ्ठल कोथेरे, पांडुरंग ढेंगळे, पांडुरंग तळपे, माजी नगरसेविका आशाताई सुपे, उषाताई मुंढे तसेच दीपक साबळे, निवृत्ती शेळकंदे, दत्तात्रय कोकाटे, गौरी लांघी, प्रतीक्षा जोशी, आनंद भवारी, ढवळा ढेंगळे, सतीश लेंभे, रूपाली डगळे, दीपक विरणक, संजय मांडवे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या सांस्कृतिक महोत्सवात आदिवासी सांस्कृतिक उत्सव समिती पुणे व पिंपरी चिंचवड शहर सह समस्त आदिवासी समाज संघटना पुणे, सर्व आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.
या शोभायात्रेचे उद्घाटन सीता किरवे यांच्या हस्ते आणि राजीव नंदकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. अध्यक्ष स्थानी विठ्ठल कोथेरे हे असणार आहेत. (PCMC)
यावेळी श्रीकांत कोळप, श्रीनिवास दांगट, मुकेश कोळप, आशादेवी दुरगुडे, हरी मोहन मीना साहेब, डॉ. पुनाजी गांडाळ, शकुंतलाताई धराडे, भाऊसाहेब सुपे, मारुती सांगडे, देवराम लांडे, रोहिणी चिमटे, संगीता केंगले आधी प्रमुख पाहुणे उपस्थिती राहणार आहेत. तसेच डॉ. संजय दाभाडे, डॉ. अमोल वाघमारे, डॉ. निर्मला झांजरे आदी मार्गदर्शन करणार आहेत.
या महोत्सवामध्ये भीमाशंकर आदिवासी तरुण मंडळ धानोरी, सह्याद्री आदिवासी तरुण मंडळ धानोरी, सह्याद्री आदिवासी महिला प्रतिष्ठान पिंपळे गुरव, आदिवासी समाज कृती समिती पुणे, महाराष्ट्र आदिवासी सेवा संघ दिघी पुणे, भारत माता मित्र मंडळ दिघी, आदिवासी महासंघ पुणे, पिंपरी चिंचवड मनपा अनुजमाती शिक्षक कर्मचारी संघटना, सह्याद्री आदिवासी विकास व प्रबोधन संस्था पिंपळे गुरव, पीएमपीएमएल आदिवासी कर्मचारी संघटना पुणे, मागासवर्गीय जिल्हा परिषद कर्मचारी संघटना पुणे, डॉ. एस. एम. सुपे मेमोरियल फाउंडेशन, सह्याद्री आदिवासी ठाकूर ठाकर उन्नती मंडळ महाराष्ट्र, सह्याद्री आदिवासी नोकरवर्ग ठाकूर ठाकर, सह्याद्री आदिवासी कोळी महादेव समाज संस्था महाराष्ट्र राज्य, आदिवासी गौंड समाज मंडळ पुणे, कोकणा कोकणी आदिवासी समाज सेवा संघ पुणे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन पुणे, ट्रायबल डॉक्टर फोरम महाराष्ट्र, ट्रायबल इंजिनियर फोरम महाराष्ट्र, आदिवासी विचार मंच महाराष्ट्र, हुतात्मा नाग्या कातकरी आदिवासी संघटना पुणे, वीर बिरसा मुंडा आदिवासी संघटना पुणे विद्यापीठ, एसटी कामगार संघटना दापोडी, आदिवासी एकता परिषद महाराष्ट्र, पुणे मनपा अनु जमाती शिक्षक व कर्मचारी संघटना, आदीम यंग ग्लॅडीएटर्स महाराष्ट्र, आदी शिवशक्ती युवक प्रतिष्ठान बोपखेल पुणे, ५१२ कमांड पतसंस्था खडकी पुणे, नवजीवन आदिवासी संस्था बोपखेल पुणे, आदिवासी सामाजिक विकास संस्था पुणे, बिरसा ब्रिगेड सह्याद्री सातपुडा महाराष्ट्र पुणे, आदिवासी सेवा मंडळ पुणे, पिंपरी चिंचवड मनपा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, भीमाशंकर मित्र मंडळ गणेश नगर बोपखेल, संगम मित्र मंडळ किवळे, आदिवासी सेवा प्रतिष्ठान पुणे, आदिवासी युवा मंच हडपसर, बिरसा क्रांती दल पुणे, उत्कर्ष संस्था महाराष्ट्र, पुणे शहर आदिवासी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित आदी संस्था सहभागी होणार आहेत.
यामध्ये पालघर येथील कलापथक आदिवासी नृत्य सादर करणार आहे. तर तेजुर येथील कलापथक डांगी नृत्य, धानोरी येथील आदिवासी महिला पथक आदिवासी नृत्य सादर करतील आणि पालघर येथील विक्रम कवटे गायन सादर करणार आहेत. या महोत्सवात सर्व आदिवासी बंधू-भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
मोठी बातमी : विमानाचा भीषण अपघात, 42 जणांच्या मृत्यूची शक्यता
मोठी बातमी : लाडक्या बहीणींच्या खात्यात आजपासून जमा होणार डिसेंबरचा हप्ता
इयत्ता पाचवी ते आठवी ढकलगाडी अखेर बंद, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय!!
प्रसिद्ध चित्रपटनिर्माते श्याम बेनेगल यांचे ९० व्या वर्षी निधन
प्रेयसीने प्रियकराचा प्राईव्हेट पार्ट कापून केला धडापासून वेगळा, वाचा काय आहे कारण