पिंपरी चिंचवड शहरात कितीपण उड्डाणपूल, प्रशस्त रस्ते असले तरी वाहतूक कोंडी का असते? सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे बेशिस्त चालक ज्यांना ना स्वतःचा अंदाज असतो ना गाडीचा. कुठेही कशीही गाडी घालून सगळी गर्दी तुंबून ठेवतात. या पैकी जास्तीत जास्त लोक बुध्दीचे ठिकाण गुडघ्यात असणारे असतात. pcmc
अपघात, वाहतूक ओव्हरलोड, बांधकाम आणि अगदी पादचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने रस्ता ओलांडणे किंवा वाहने अडवणे, फुटपाथवर व्यवसाय, यासारख्या प्रमुख कारणांमुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये, खराब रस्ते आणि इतर कारणांसह खराब कनेक्टिव्हिटीमुळे वाहतूक कोंडी अधिक गंभीर होते. PCMC
देशातील सहा शहरांमधील रहदारी असलेल्या प्रमुख रस्त्यांचा एक अभ्यास अलिकडेच प्रसिद्ध झाला आहे. त्यात हे स्पष्ट झाले आहे की, जगभरातील प्रवाशांपेक्षा भारतीय प्रवाशांचा अधिक वेळ दैनंदिन प्रवासात वाया जातो. नेहमीचे रस्ते असोत की टोल भरावे लागणारे रस्ते, कुठेही गेलो तरी देशातील विविध शहरांमध्ये वाहतुकीची कोंडी इतकी वाढली आहे की, घरी परतताना प्रवासी त्यांच्या गाडीत, गर्दीने भरलेल्या सार्वजनिक वाहतुकीतील बसेसमध्ये किंवा टॅक्सीत तासनतास घालवतो.
भारतीय शहरांमधील जवळजवळ सर्वच महामार्गांवर ठप्प झालेल्या वाहतुकीमुळे आणि वाहनांचा वेग अतिशय मंदावल्याने आता आपल्याला सार्वजनिक रस्त्यांच्या आर्थिक मूल्याचा पूनर्विचार करणे भाग आहे. pcmc
मुंबई आणि आसपासच्या परिसरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. पार्किंगची जागा असेल तरच नवं वाहन खरेदीची परवानगी द्यायला हवी असं मत व्यक्त करत लोकांना परवडंतय म्हणून एका कुटुंबाला 4 ते 5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता? असा थेट सवाल असा सवाल ऑगस्ट २०२१ मध्ये एका सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केला होता.
त्यावेळी सरकारी वकिलांनी सांगितले की, वाहन खरेदीवर कायद्यानं कुठलंही बंधन घातलेलं नाही, त्यानंतर या मुद्यावर कोणीही न्यायालयासमोर गेले नाही
देशातील विविध शहरात पुणे, बंगळूर आणि आपले पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडीने त्रस्त आहे, नव्या विकास आराखाड्या नुसार कितीही टाऊन प्लॅनिंग केले तरी पुढील २० वर्षात पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या ४० लाख असू शकणार आहे.
पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर आहे, येथील निवासी क्षेत्राचा भूगोल आणि औद्योगिक क्षेत्राचा भूगोल अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे, या शहरातील सुमारे किमान ४ लाख लोक कामानिमित्त चाकण, तळेगाव, पिंपरी चिंचवड एमआयडीसी कामानिमित्त जातात.
२००८ पासून पुणे मेट्रो प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल असे प्रत्येक सरकारला वाटले किंवा एकूण १३००० हजार कोटींचा मेट्रो प्रकल्प अद्यापही पूर्ण झालेला नाही, देशातील सर्व मेट्रो, मोनोरेल प्रकल्प तोट्यात आहेत, शहरातील जनतेला औद्योगिक क्षेत्रात किंवा आय टी कंपन्यात कामाला जाण्यासाठी या प्रकल्पाचा भविष्यात उपयोग होणार नाही.
येथील PMPML ची बससेवा आणि लोणावळा पुणे लोकल सेवा यासाठी कोणीही स्वस्त आणि गरजेनुसार गरजेच्या रूटवर मुंबईच्या बेस्ट सेवेसारखी प्रवासी सेवा द्यावी, यासाठी नियोजन केलेले नाही. मेट्रो मुळे आता ट्रॅफिक जॅम होत आहे, रिक्षासेवेचे योग्य व्यवस्थापन नाही, एमआयडीसी मध्ये जाण्यासाठी पुरेशा बसेस नाहीत, उच्च वेतन असलेले लोक कार घेऊन लवकर कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रचंड मनस्ताप करत आहेत, सर्वात जास्त प्रवासी पुणे नाशिक हायवेने वाहतूक कोंडीचा सामना करत कामावर जात आहेत.निगडी, तळवडे, चाकण हा परिसर मोठा वाहतुकीचा प्रश्न आहे.
पुरेशी सार्वजनिक वाहतूक नाही, पुरेशा सार्वजनिक वाहतुकीच्या अभावामुळे लोकांना दुचाक्या, कार खरेदी करून कामावर जावे लागते. उदाहरणार्थ, बेंगळुरू त्याच्या वाहतूक कोंडीसाठी कुप्रसिद्ध आहे, जे मुख्यतः पुरेशा सार्वजनिक वाहतुकीच्या अभावाशी संबंधित आहे. अशा प्रकारे, बहुसंख्य लोक वैयक्तिक वाहन खरेदी करतात, ज्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. उड्डाणपूल, स्पाईन रस्ते, अंडर पास आणखी काहीही केले तरी वाहतूक कोंडी कमी होणार नाही. pcmc
स्टेटस सिम्बॉल म्हणून कार खरेदी करून रस्ते व्यापले जात आहेत.
चांदणी चौकातील उड्डाणपूल बांधल्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली नाही, चिंचवड ते बायपास या रूटवर वाहतूक कोंडी आहे, मेट्रो सिटीच्या कामात प्रचंड निधी सरकारने दिला, पण लोक सुखी नाहीत, आपल्या देशात कोणताही प्रोजेक्ट युरोप अमेरिकेची कॉपी पेस्ट असते, एकतर आपल्या देशात आणि शहरात वाहतूक नियम हे कागदावर आहेत, या देशातील कार इंडस्ट्रीचे भले व्हावे, असे चित्र सर्वत्र आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात लोकसंख्येपेक्षा खाजगी वाहने जास्त झाली आहेत, हा आकडा किमान २८ लाख असू शकेल. यातील बरीचशी वाहने पैसा उपलब्ध आहे, वित्तीय संस्था कर्ज देतात म्हणून काही गरज नसताना लोक गाड्या खरेदी करत आहेत.
ज्या काळात म्हणजे १९८० पासून टाटा मोटर्स, बजाज, फोर्स कंपन्यांनी कामगारांसाठी स्वतःची बससेवा लोणावळा, राजगुरुनगरपासून पुणे, पिंपरी चिंचवड शहारातील कामगारांसाठी यशस्वी व्यवस्थापन करून राबवली आहे, आपले कामगार वेळेवर कामावर यावेत, वेळेवर घरी पोचावेत या उदात्त हेतूने या कंपन्यांनी यशस्वी वाहतूक व्यवस्थापन सुरू ठेवले आहे.
त्या काळात PMT/ PCMT या दोन्ही शासकीय बससेवा विश्वासार्ह नव्हत्या, आजही पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक बससेवा सक्षम केली, तर खाजगी वाहने कमी होऊन देशाचे इंधन वाचेल, तसेच प्रदूषण कमी होऊ शकते.
बुलेट ट्रेन, मेट्रो प्रकल्प हे विशिष्ट वर्गासाठी असतात, आपल्या देशाचा एकूण लोकसंख्येचा व्याप पाहता ९३ टक्के श्रमिक वर्गासाठी कॉपी पेस्ट प्रकल्प पांढरे हत्ती ठरणार आहेत, त्यांना त्याचे तिकीट वाढले तरी परवडणार नाही.
बससेवा सक्षम करून कामगार, विद्यार्थी, महिलांना तिकीट खर्चात मोठी सवलत पिंपरी चिंचवड महापालिकेने दिली तर खाजगी वाहनांची संख्या कमी होईल, एका बसमध्ये किमान ४५ लोक प्रवास करू शकतात, तुलनेने एक कार किती रस्ता व्यापते याचा केस स्टडी करण्यासाठी CIRT सारख्या संस्था शहरात आहेत. वाहतूक तज्ञ आणि लोकमत समजून घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारता येईल. युरोप मधील काही देशामध्ये सुरक्षित, प्रदूषणमुक्त रस्ते करण्यात काही देश यशस्वी झाले आहेत.
पोलिस वाहतूक नियंत्रण करण्यासाठी असतात, वाहतूक कोंडी कमी करणे हे त्यांचे काम नाही, आपल्या लोकप्रतिनिधींनी शांतपणे टीम वर्क करून जे आपल्याला कळत नाही, त्यासाठी अभासू सल्लागार नेमावेत, शहरे विकासाची केंद्रे असतात, शहरांमध्ये व्यवसाय, नोकरीच्या संधी असतात, मागील तीस वर्षात जागतिकीकरणाचा सर्वात जास्त फायदा भारताला झाला आहे, शहरे विकसित झाली की, देशातील गरीबी कमी होते, पायाभूत सुविधांचा विकास करून चीनची प्रचंड लोकसंख्या गरिबीतून मुक्त झाली आहे. pcmc
हे सर्व करण्यासाठी आठवडे बाजार, फेरीवाले यांचेसाठी स्वतंत्र झोन जे २००९ पासून प्रलंबित आहेत, ते मंजूर करून घ्यावेत, पार्किंग नसेल तर कार खरेदीवर बंदी घातली पाहिजे, या शहरात दरवर्षी एक लाख लोक पोटापाण्यासाठी येत आहेत, त्यांची वाहतुकीची सोय केली पाहिजे. PCMC
शहरातील चौकात ट्रॅव्हल बसेस उभ्या असतात, त्यांच्या साठी वाहनतळ दिले पाहिजेत, अवजड वाहने येथील कंपन्यात कच्चा माल घेऊन येतात, उत्पादित माल घेऊन जातात, त्यांना सन्मानाने पार्किंग उपलब्ध करून दिले पाहिजे.
बहुतांश चार चाकी घराच्या बाहेर महानगरपालिकेच्या रस्त्यावर पार्क केलेल्या असतात, त्यामुळे फूटपाथ आणि पादचारी नागरिकांचे हक्क इतिहास जमा झाले आहेत.
चाकण एमआयडीसी मध्ये २००० साली कारखानदारी सुरू झाली, परंतु तिथे सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, निवासी क्षेत्र मुलभूत सुविधा निर्माण करण्यात सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे लोक पिंपरी चिंचवड शहरात राहत आहेत.
विविध प्रकारच्या वाहनांसाठी रस्ते विविध लेनने चिन्हांकित केले पाहिजेत आणि लेनची शिस्त पाळण्यासाठी वाहनचालकांना सक्ती करण्यासाठी कायदा, म्हणजे आर्थिक दंड लागू केला जावा.
स्मार्टसिटी आणि ‘स्मार्ट’ “टेक्नॉलॉजीचा वापर हा लोकांच्या सेवेसाठी, त्यांचं शहरातलं आयुष्य सुधारण्यासाठी करण्यात यायला हवा, यावर आमचा विश्वास आहे,”
पार्किंगसाठी जागा नसल्याने लोकं रस्ते आणि फुटपाथ सारख्या सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करतात, त्यांच्यावर ऑक्युपाशन चार्जेस लावले पाहिजेत, ज्याचा फटका ट्रॅफिकला बसतो. वारंवार तक्रार आणि निर्देश देऊनही इथे कोणी कायद्याचे पालन करत नाही, अशा लोकांना कायद्याचे राज्य हवे, की वैयक्तिक फायद्याचे सोयीचे राज्य हवे आहे, यासाठी आधी जनजागृती करावी, अन्यथा बेकायदेशीर पार्किंग मधील गाड्या जप्त करून कायदेशीर मार्गाने लोकांना पण शिस्त लावली पाहिजे.
क्रांतीकुमार कडुलकर : पत्रकार पिंपरी चिंचवड
हेही वाचा :
सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली
धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ
ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती
स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची
PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा
ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !
शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!
मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा
ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी
मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी