Saturday, December 7, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरेकेड्स लावा

PCMC : आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरेकेड्स लावा

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका परिक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी सूचनाफलक, बॅरेकेड्स लावावेत कोणतीही दुर्घटना घडणार नाही, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात, अशा सूचना सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांनी सर्व विभाग प्रमुख आणि क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या. pcmc

पुणे जिल्ह्यात पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी दुर्घटना घडून जीवितहानी झाली आहे. त्यानुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने महापालिका क्षेत्रात संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी तात्काळ आपत्ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. pcmc

पिंपरी चिंचवड शहरातील नदी घाट ,पूल, तलाव, बंधारे, उद्याने, खाणी अशा ठिकाणी नागरिक पावसाळी पर्यटनासाठी येतात.

त्यानुसार आपल्या कार्यक्षेत्रातील संभाव्य आपत्ती प्रवण स्थळांच्या ठिकाणी नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. गरजेच्या ठिकाणी बॅरेकेड्स लावणे, तसेच धोकादायक झाडे, रस्त्यावरील खड्डे, धोकादायक फलक, मनोरे, इमारती, विजेचे डी.पी.बॉक्स व ट्रान्सफार्मर संदर्भात संबंधित विभाग आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयांनी पूर्व दक्षता घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना सह आयुक्त इंदलकर यांनी दिल्या. pcmc

दरम्यान, सह आयुक्त इंदलकर म्हणाले, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षासह सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी पूर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. pcmc

तसेच शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा, इंद्रायणी नद्यांची पाणी पातळी वेळोवेळी तपासण्यात येत आहे. सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी २४ तास कार्यरत असलेले “आपत्कालीन प्रतिसाद पथक” (Emergency Response Team) स्थापन करण्यात आल्या असून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी या पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी नागरिकांना केले आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

सर्वात मोठी बातमी : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठे बदल, तारिखही वाढविली

धक्कादायक : सत्संग कार्यक्रमातील चेंगराचेंगरीत 87 जणांचा मृत्यू, देशभरात खळबळ

ब्रेकिंग : दूध उत्पादकांसंदर्भात महत्वाची बातमी, सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

ब्रेकिंग : आदिवासी विकास विभागातील भरती संदर्भात मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

स्वस्त धान्य दुकानाचा परवानाचा हवाय ? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 2700 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : राज्य सरकारचा मोठा निर्णय ; राज्यात लवकरच पाच फिरत्या अन्न तपासणी प्रयोगशाळा

ब्रेकिंग : पर्यटकांसाठी महत्वाची बातमी ; पर्यटनस्थळी नवीन सुरक्षा नियम लागू !

शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज!

मोठी बातमी : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची घोषणा

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ; पीक विमा योजनेच्या अर्जासाठी जास्त पैसे मागितल्यास तक्रार करा!

ब्रेकिंग : मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर ४ हजार ८३ मते मिळवून विजयी

मोठी बातमी : नाशिक शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे विजयी

संबंधित लेख

लोकप्रिय