Monday, May 20, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : शहरातील सोसायट्यांमध्ये स्थानिक गुंडांकडून दहशत, मारहाण, कडक कारवाईची...

PCMC : शहरातील सोसायट्यांमध्ये स्थानिक गुंडांकडून दहशत, मारहाण, कडक कारवाईची मागणी

चिखली – मोशी – पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनचे पोलीस आयुक्तांना निवेदन

पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर
: शहरातील अनेक सोसायट्यांमधे काही स्थानिक गुंडांकडून सोसायटीत येऊन सोसायटी कमिटीचे सदस्य तसेच इतर सदस्यांना मारहाण होत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. PCMC शहरातील काही स्थानिक गुंडांकडून शहरातील सोसायटी धारकांना तसेच मॅनेजमेंट कमिटी मधील चेअरमन, सेक्रेटरी इतर पदाधिकाऱ्यांना सतत मारहाण केली जात आहे धमक्या दिल्या जात आहेत. आणि या मारहाणीच्या PCMC घटनेबाबत धमक्याच्या घटनेबाबत आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस स्टेशनला सोसायटी मार्फत तक्रार केली असताना पोलिसांकडून व्यवस्थित तक्रार नोंदवून घेतली जात नाही, त्याची चौकशी व्यवस्थित केली जात नाही. वेळच्यावेळी अशा गोष्टीबाबत आलेल्या तक्रारीची नोंद न घेतल्यामुळे तसेच त्याची चौकशी न केल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरांमध्ये वारंवार अशा घटना घडत आहेत.अशा घटनांची गंभीर नोंद करून त्याचा त्वरित तपास केला जात नाही,असा आरोप चिखली – मोशी – पिंपरी चिंचवड हाउसिंग फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केला आहे. PCMC

सदर निवेदनात म्हंटले आहे की, 2 मार्च 2024 रोजी पिंपरी येथील महिंद्रा अंथीया या सोसायटीमध्ये या सोसायटीच्या सेक्रेटरीला अशाप्रकारे बाहेरील गुंडांकडून जबर मारहाण झालेली आहे. आणि या मारहाणीच्या बाबत तक्रार केली असताना आपल्या पोलीस प्रशासनाकडून त्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली गेलेली नाही.उलट पक्षी ज्यांना मारहाण झाली त्यांचीच चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हे नोंदवण्याचे अजब काम आपल्या पोलीस स्टेशनमध्ये केले जात आहे.अशाच घटना चिखली, मोशी, चऱ्होली , पिंपरी, पुनावळे, पिंपळे सौदागर, सांगवी , रावेत अशा ठिकाणच्या सोसायटीमध्ये परिसरातील गुंडांकडून सोसायटीमध्ये येऊन मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत.

माननीय महोदय वरील सर्व गंभीर गोष्टीची नोंद घेऊन मुंबई पोलीस आयुक्तालयांच्या प्रमाणे आपल्या पिंपरी चिंचवड शहरात देखील सोसायटीधारकांच्या विविध कायदेशीर समस्या बाबत प्रत्येक पोलिस स्टेशनला एक स्वतंत्र विभाग करण्यात यावा आणि त्यासाठी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची यासाठी विशेष नेमणूक करण्यात यावी जेणेकरून अशा तक्रारीची नोंद घेऊन त्यावर लवकरात लवकर कारवाई करता येईल आणि अशा घटनेला आळा बसेल अशा प्रकरची कारवाई करण्याची आमच्या फेडरेशन कडून आपणाला विनंती करण्यात येत आहे. तसेच अशा घटना घडल्यानंतर सोसायट्यांकडून आलेल्या तक्रारीवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी संजीवन सांगळे यांनी केली आहे.


प्रतिक्रिया :

पिंपरी चिंचवड शहरातील बऱ्याच सोसायटीमध्ये असे प्रकार वारंवार घडत आहेत परंतु पोलीस प्रशासन कोणाच्यातरी दबावाखाली येऊन तक्रार नोंदवून घेत नाही किंवा तक्रार नोंदवून घेतली तरी योग कलम लावली जात नाहीत.अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आणि सोसायटीधारकांच्या संरक्षणासाठी मुंबई शहराप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात देखील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी एका स्वतंत्र पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करावी जेणेकरून या सर्व गोष्टीचा तपास लवकर होऊन गुन्हेगारास योग्य ती शिक्षा मिळेल.

संजीवन सांगळे, अध्यक्ष,चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन


सदर निवेदनाच्या प्रती देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री यांनाही पाठवण्यात आलेली आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय