पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : मावळ तालुक्यातील कचरेवाडी व करंजगाव पठार येथील जिल्हा परिषदेच्या 2 शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या व इतर स्टेशनरी साठी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेकडे शाळेच्या वतीने मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार जवळपास 7500 /- रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य शाळेकडे सुपूर्द केले. PCMC
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा बडगुजर यांनी सर्वांचे स्वागत करत विद्यार्थ्यांना संस्था व सर्व पदाधिकार्यांची ओळख करून दिली. रयत विद्यार्थी विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घेण्याबरोबरच संस्था त्यांच्या समवेत शैक्षणिक मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन दिले. pcmc
संस्थेचे महासचिव संतोष शिंदे यांनी रयत विद्यार्थी विचार मंचाची भूमिका मांडली. राज्य संपर्क प्रमुख/ मावळ तालुका अध्यक्ष अतुल वाघमारे यांनी संस्थेची संकल्पना मांडताना विद्यार्थ्यांना देखील मोठे होऊन अशीच समाजाशी नाळ जोडण्यासाठी आवाहन केले. pcmc
मावळ तालुका महासचिव प्रा. विक्रांत शेळके यांनी मुलांशी मोकळ्या भाषेत संवाद साधत मुलांना हसवून त्यांना शिक्षण, करिअर , अभ्यास, खेळ या सर्वांना समान महत्व देत आयुष्य जगण्याविषयी मार्गदर्शन केले. मावळ तालुका उपाध्यक्ष सागर गायकवाड यांनी आभार मानले.
हेही वाचा :
मोठी बातमी : देशात एँटी पेपर लीक कायदा लागू, मध्यरात्री अधिसूचना जारी, वाचा काय आहे कायदा !
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
युद्ध थांबवले पण पेपरफुटी थांबवता आली नाही… राहुल गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
मोठी बातमी : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन
सर्वात मोठी बातमी : पोलिस भरती संदर्भात सरकारचा मोठा निर्णय