Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याPCMC : वयात आलेल्या मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी मित्र मैत्रिणींची माहिती पालकांनी घ्यावी :...

PCMC : वयात आलेल्या मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी मित्र मैत्रिणींची माहिती पालकांनी घ्यावी : वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर

सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ संस्थेची चिखली पोलिसांना कौतुकाची थाप

पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर : दि.४ – सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ,पुणे या संस्थेने चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर काटकर व त्यांच्या टीमचा चिखली येथून 13 वर्षाची पळवून नेलेली अल्पवयीन मुलगी हिमाचल प्रदेश मधून सुखरूप परत आणल्याबद्दल चिखली पोलीस ठाणे येथे सत्कार आयोजित केला होता.

श्री काटकर यांनी अतिशय अवघड असलेली कार्यवाही अहोरात्र कष्ट घेऊन कशी पार पाडली याची माहिती दिली.


या वेळी सायबर व अल्पवयीन गुन्हेगारी बद्दल बोलताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.ज्ञानेश्वर काटकर यांनी सांगितले की, पालकांनी वयात आलेल्या मुला-मुलींचे मित्र मैत्रिणी कोण आहेत,याची माहिती करून घेतली पाहिजे.त्यांच्या शरीरात होणाऱ्या नैसर्गिक भिन्न लिंगी आकर्षण व खोटे प्रेम मायाजाळ यामुळे त्यांचे लैंगिक शोषण होण्याचे गुन्हे घडत आहेत.मोबाईल, इंटरनेट च्या युगात बदमाश वृत्तीचे गुन्हेगार अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेतात, आम्ही पोलीस अशा घटना घडल्यावर गुन्हेगार शोधून मुलींना सही सलामत परत आणतो,परंतु पालकांनी मुलामुलींना संस्कार आणि चांगले शिक्षण दिले तर मुली सुरक्षित राहतील.
सर्व नागरिक, सामाजिक संस्था आणि पोलीस एकत्र आले तर सामाजिक सुरक्षितता वाढते, असे काटकर यांनी आभार व्यक्त करताना सांगितले

पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष महेंद्र शेळके,खेड तालुका अध्यक्ष अमोल नेपते यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुंभारे,राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस परमार व पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांनी पुणे टीम चे कौतुक केले. सदर प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात,पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर, ज्योती जाधव मॅडम,राहुल गवळी व इतर सदस्य उपस्थित होते पुणे जिल्हा उपाध्यक्ष भगवान वायकर यांनी आभार मानले.

संबंधित लेख

लोकप्रिय