पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण निरीक्षक कै.संजय सुर्वे व गुणवंत कामगार ज्येष्ठ साहित्यिक कामगार कवी कै.ऊद्धव कानडे यांच्या दुःखद निधना निमित्त गुणवंत कामगार कल्याण मंडळ यांचे वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली.
या प्रसंगी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा डाँ.भारती चव्हाण यांनी यांनी संजय सुर्वे व कवी उद्धव कानडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.कुटुंबीय सर्व सभागृहातील शोकाकुल भावनिक झाले होते. प्रत्येकजण संजय सुर्वेच्या आठवणींना उजाळा देऊन आपल्या भावना व्यक्त करत होते.सुर्वे यांनी कामगाराप्रती असणाऱ्या योजना पोहोचल्या होत्या व प्रत्येक कामगार कल्याण मंडळातील सदस्य आपल्या कुटुंबातील सदस्य आहे,अशी त्यांना वागणूक देत होते प्रत्येक कामगाराची ते आपुलकीने व चौकशी करत असल्याचे भारती चव्हाण यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षा भारती चव्हाण,नगरसेवक कामगार नेते श्री केशव घोळवे,कामगार कल्याण केंद्र अधिकारी श्री.अनिल कारळे,औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक अनिल घोगरे,बाष्पके बाँयलर विभागाचे सहसंचालक सी.जी.पवार,बांधकाम कामगार महामंडाळाचे महेंद्र वाघमारे,थरमँक्स कामगार संघटनेचे अध्यक्ष किशोर सोमवंशी,टाटा मोटर्स कामगार प्रतिनिधी विलास सकपाळ,टाटा मोटर्स पतपेढीचे सेक्रेटरी राजेंद्र येळवंडे,कै.यशवंतराव चव्हाण स्मारक समितीचे गोपीचंद जगताप,शिवशंभो फौंडेशनचे सहसचिव राजेंद्र पवार,टाटा मोटर्स समाज विकास केंद्र सचिव शिवाजीराव पाटील,पिंपरी चिंचवड साहित्य संघाचे तानाजीराव एकोंड,टाटा मोटर्स कलासागर साहित्य विभागाचे सदस्य भरत बारी, संभाजीनगर केंद्रातील शिवणक्लास वर्गातर्फे रुपाली मुळीक,योगा वर्गा तर्फे रविंद्र बटाटे ,व्यसनमुक्ती वर्गातर्फे चंद्रमोहन गुप्ता सह विविध संस्था व आस्थापनातील कर्मचारी, गुणवंत कामगार,अधिकारी,केंद्र सभासद,कामगार कुटुंबिय,कामगार नेते उपस्थित होते.पसायदानाने या सभेची सांगता करण्यात आल.गुणवंत कामगार कल्याण मंडळाचे सचिव राजेश हजारे यांनी या सभेचे सुत्रसंचालन प्रास्ताविक केले.
या सभेसाठी गुणवंत कामगार कल्याण मंडळ राज्यस्तरीय कोअरचे सदस्य भरत शिंदे आण्णा जोगदंड,तानाजी एकोंडे,गोरखनाथ वाघमारे, शहराध्यक्ष महमंदशरीफ मुलानी यांनी नियोजन केले होते.