पिंपरी चिंचवड/ क्रांतीकुमार कडुलकर : पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल, चऱ्होली मध्ये शैक्षणिक सरत्या वर्षाच्या शेवटी मुलांना आनंद आणि मुलांना व्यवसाय आणि व्यवहारिक ज्ञान मिळवण्याच्या दृष्टिकोनातून शाळेमध्ये फनफेअर फिस्टचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष अनंत काळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले.तसेच ॲड.सचिन अनंत काळे (नगरसेवक आळंदी नगरपरिषद) यांची भारत सरकारच्या नोटरी पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये खाद्यपदार्थाची दुकाने, स्टेशनरी साहित्य, अलंकाराचे साहित्य, शैक्षणिक साहित्य इत्यादी दुकाने थाटली होती.
मुलांचे मनोरंजन करण्यासाठी जादूचे प्रयोग, व विविध खेळ, विद्यार्थी व पालकांनी संगीतमय नृत्य, ई कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
संस्थेचे संचालक नवनाथ काळे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य व व्यवहारीक ज्ञान अशा कार्यक्रमामधूनच आम्ही रुजवत असतो. असे त्यांनी मत व्यक्त केले.
संस्थेचे संचालक ॲड. सचिन काळे यांनी विद्यार्थ्यांच्या दुकानाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे मार्केटिंग ज्ञान जाणून घेतले, कुंदा काळे यांनी विद्यार्थ्यांचे मुलांचे भरभरून कौतुक केले.
स्वाती काळे मुख्याध्यापिका किड्स पॅराडाईज स्कूल यांनी प्रास्ताविकात संस्थापक, पालक, विदयार्थी तसेच शाळेच्या विविध उपक्रमांची माहिती देऊन सर्वांचे स्वागत,कौतुक केले.
कार्यक्रमाची इव्हेंट मॅनेजमेंट प्रज्ञा काळे मुख्याध्यापिका पॅराडाईज इंटरनॅशनल स्कूल यांच्या टीमने केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री काटे व मुख्याध्यापिका प्रज्ञा काळे यांनी केले.
संयोजन सहशिक्षिका जिजाबाई कल्याणकर, आशा थोरात, वैशाली येडे, प्रियंका वाघ, शारीरिक शिक्षक संदेश साकोरे ,प्रशांत हराळ, अभिषेक हजारंगे, प्रणव साकुंदे, सपना शिंपी यांनी केले.