Saturday, July 27, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जनसंवाद सभेत ६६ तक्रारीवर कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

PCMC : जनसंवाद सभेत ६६ तक्रारीवर कार्यवाही करण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : दि.१० : महापालिकेच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांमध्ये पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ६६ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे ८, १०, १, २,१२, ४, १६ आणि १३ तक्रारी वजा सूचना मांडल्या. पावसाळ्याच्या अनुषंगाने तुंबलेली गटारे तसेच ड्रेनेजसफाईसाठी आवश्यक ठिकाणी क्षेत्रीय स्तरावर पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचना समन्वयक तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना दिल्या. pcmc jansavad

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते.

सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या महापालिका क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचेता पानसरे, अमित पंडित, डॉ. अंकुश जाधव, राजेश आगळे, सिताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे उपस्थित होते. pcmc

आज झालेल्या जनसंवाद सभेत विविध तक्रार वजा सूचना प्राप्त झाल्या. नदीतील जलपर्णी काढावी, पावसामुळे तुंबणा-या गटर्सची साफसफाई करावी, डास प्रतिबंधक धूरफवारणी करावी, पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, शहरामध्ये आवश्यक ठिकाणी स्थळदर्शक, दिशादर्शक आणि मार्गदर्शक फलक लावावेत, शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची (CCTV) वारंवार पाहणी करून नादुरुस्त असलेले कॅमेरे तात्काळ दुरुस्त करावेत, अनधिकृत बांधकामे तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई करावी आदी सूचनांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होता.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : केंद्रीय मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर, वाचा कुणाला मिळाले कोणते खाते ?

मोठी बातमी : शाळकरी मुलांसाठी ‘एक राज्य एक गणवेश’ योजना लागू होणार

Manipur : अस्वस्थ मणिपूर, शांत करा, संघाचा (RSS) केंद्र सरकारला इशारा?

Air Force : इंडियन एअर फोर्स कॉमन एडमिशन टेस्टमध्ये 304 पदांसाठी भरती

मोठी बातमी : डेन्मार्कच्या पंतप्रधान मेट फ्रेडरिक्सन यांच्यावर हल्ला

ब्रेकिंग : ममता बॅनर्जी यांचा मोठा दावा काही दिवसांत इंडिया आघाडीचे सरकार

मोठी बातमी : इंडिया आघाडीकडून नितिश कुमार यांना पंतप्रधान पदाची ऑफर

ब्रेकिंग : शिंदे गटाच्या नेत्यांचा खळबळजनक दावा, ठाकरे गटाचे दोन खासदार संपर्कात

ब्रेकिंग : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचे निधन

ICF : 10 वी, 12 वी, ITI उत्तीर्णांसाठी इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 680 जागांसाठी भरती

मोठी बातमी : राज्यात अतिवृष्टीचा इशारा ; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय