पिंपरी चिंचवड /क्रांतीकुमार कडुलकर:दि.४ – आपले शहर स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदुषणमुक्त करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण समितीच्या वतीने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. या अंतर्गत १ ते ३ मार्च या कालावधीत ‘रानजाई महोत्सव’ व २७ वे भव्य फळ, फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन निगडी, प्राधिकरण येथे करण्यात आले होते. या महोत्सवास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) कॅम्पसने एकूण २२ पैकी १९ बक्षीसे मिळवली. यामध्ये प्रथम क्रमांकाची पाच, द्वितीय क्रमांकाची दहा आणि तृतीय क्रमांकाची चार बक्षिसे आहेत. खाजगी शाळा, महाविद्यालयांमधील २५ पेक्षा जास्त वृक्षारोपण विभागात प्रथम क्रमांक; शोभिवंत पानांच्या कुंड्यांमध्ये प्रथम क्रमांकाची पाच बक्षिसे आणि द्वितीय क्रमांकाची १० बक्षीसे व तृतीय क्रमांकाची तीन बक्षिसे तसेच एक एकर पेक्षा जास्त बागक्षेत्र विभागामध्ये तृतीय क्रमांकाचे बक्षीस अशी एकूण १९ बक्षिसे पीसीसीओई ने मिळवली आहेत.
आमदार उमा खापरे आणि अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी उपआयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत मुतियान, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
या यशाबद्दल पीसीसीओई चे कॅम्पस इन्चार्ज प्रताप देवकर व संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांचे पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.