Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC news : बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू ठेवा - कामगार...

PCMC news : बांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी सुरू ठेवा – कामगार नेते काशिनाथ नखाते

आचारसंहितेमुळे ऑनलाईन फॉर्म स्वीकृती बंद करणे अन्यायकारक

पिंपरी चिंचवड : दि.२
– महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी नोंदणी व नोकरीकरण प्रक्रिया आचारसंहितेचे कारण पुढे देत थांबवण्यात आलेले आहे मात्र हे अयोग्य असून महाराष्ट्र राज्यातील वीस लाख कामगारावरती हा अन्याय आहे नोंदणी आणि नूतनीकरण प्रक्रिया त्वरित सुरू करावी अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज मुंबई येथे मंत्रालयात जाऊन महामंडळाचे उपसचिव दादासाहेब खताळ यांचेकडे केली आहे . यावेळी राज्य समन्वयक विनिता बाळेकुंद्री , रतीव पाटील, मंगेश कांबळे, सलीम डांगे यांचे सह महाराष्ट्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.(PCMC news)

कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने मुख्य निवडणूक आयुक्त व महामंडळाचे सचिव यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात कामगारांची नोंदणी व नूतनीकरण बाबतचे ONLINE अर्ज स्वीकृती होणे गरजेचे आहे मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे .(PCMC news)PCMC news : Continue online registration of construction workers – labor leader Kashinath Nakhate

महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने दिनांक १६ मार्च २०२४ च्या पत्रा नुसार थांबवण्यात आलेली आहे, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ आचारसंहिताचे कारण याबाबत देण्यात आलेले आहे. मात्र महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांचे जीवन असुरक्षित असून दर दिवसला कामावरती अपघाती मृत्यू होत आहेत.अशा कामगारांना लाभ देऊ शकलो नाही तर त्यास मंडळ जबाबदार असेल, गरजू कामगारांचे नविन व नुतनीकरण अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीने स्वीकारत नसल्यामुळे या लाभापासून वंचित राहावे लागत असून केवळ ऑनलाइन अर्ज भरणे म्हणजे लाभ देणे नव्हे.(PCMC news)

कामगारांना नियमाप्रमाणे मिळणारे लाभ हे निवडणुकीच्या आचारसंहिता संपल्यानंतर देता येतील मात्र ऑनलाईन नोंदणीचे व नुतनिकरनाचे अर्ज स्वीकारण्यात यावेत. याबाबत गांभीर्याने विचार करून बांधकाम कामगारांचे नुकसान व हानी टाळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृती करण्यात यावी अशी मागणी केली. अप्पर सचिव उपस्थित नसल्यामुळे दादासाहेब खताळ उपसचिव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच २० लाख कामगारांना दिलासा मिळणार आहे .(PCMC news)

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय