पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : इंद्रायणी,पवना मुळा मुठा नदीच्या पात्रात असणारी जलपर्णी पावसाच्या पाण्यात पूराने वाहून गेली. त्यामुळे नद्या जलपर्णी मुक्त झाल्या.. त्यामुळे जलपर्णी काढण्याच्या करिता जे कोट्यवधी रुपयांची कामे ठेकेदार यांना दिली होती त्याची रक्कम ठेकेदार यांना देण्यात येऊन नये. कारण ठेकेदार पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढत नाहीत, नदीला महापूर आला की, जलपर्णी वाहून जाते, हे त्यांना माहीत असते, उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी इंद्रायणी, पवना नदीत असते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते. या बाबत तपशील वार निवेदन देऊन सामाजिक कार्यकर्ते राहूल कोल्हटकर यांनी संबंधित ठेकेदारांची बिले अदा करू नयेत, अशी मागणी निवेदाद्वारे आयुक्त शेखर सिंह यांना केली आहे. (pcmc)
राहुल कोल्हटकर यांचे मुद्दे
१.पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याकरिता निविदा प्रक्रिया राबवण्यात येऊन कामाचे आदेश दिले पण प्रत्यक्षात सदर काम झालेच नाही अनेक नदीपात्रातील नद्यातील जलपर्णी पुराच्या पाण्याने वाहून गेली असल्याने संबंधीत कामाची चौकशी करण्यात यावी. (pcmc)
२. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याकरिता दिलेले काम संबंधित ठेकेदार यांनी केले नसल्यास संबंधित ठेकेदार यांच्यावर योग्य कारवाई करून त्याचे बिल थांबण्यात येऊन सदर ठेकेदार यांना काळ्या यादीत (black list) टाकण्यात यावे.
३.पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याकरिता दिलेल्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षक किंवा आरोग्य अधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून संबधीत अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी. (pcmc)
सर्व प्रथम तर एक उत्तम प्रशासक म्हणून पूरस्थिती निर्माण झाली असताना शहरातील नागरिक यांची जी आपण काळजी आणि मदत केली तसेच जे उत्तम नियोजन केले त्याबद्दल आपले आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी याचे मनापासून आभार
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून वाहणाऱ्या नद्यांच्या कडे पाहिल्यावर येत होता पण मुसळधार पावसामुळे नद्यातील जलपर्णी पावसाच्या पुराच्या पाण्यात वाहून आणि नद्या जलपर्णी मुक्त झाल्या.
पिंपरी चिंचवड शहरातून मुळा , पवना, इंद्रायणी या नद्या वाहतात नदी प्रदूषणाचा प्रश्न तर मोठा आहेच त्यावर योग्य निर्णय, नियोजन, उपाययोजना करणे गरजेचे आहे याकरिता पिंपरी चिंचवड मनपा कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत पण नद्या प्रदूषण मुक्त अजूनही झाल्या नाहीत. (pcmc) पण दरवर्षी पावसाळ्याचे दिवस आले की जलपर्णीच्या बातम्या वाचण्यात येतात. कोट्यवधी रुपयांचे टेंडर मनपाच्या वतीने दरवर्षी काढण्यात येते पण त्यावर योग्य काम होते का नाही हे मनपा प्रशासन यांच्यावतीने पाहण्यात येत नाही.
जानेवारी ते मार्च दरम्यान टेंडर प्रक्रिया राबवण्यात येते पावसाळ्याच्या आधी हे काम होणे आवश्यक आहे पण ठेकेदार पावसाची वाट पाहण्यात मग्न असतात कारण पावसाळ्यात नदीच्या पाण्याची पातळी वाढली की जलपर्णी काढावी लागत नाही तर ती पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाते त्यामुळे काम करण्याची गरज पडत नाही .. हे दरवर्षीच होते.
यावर्षी सुद्धा ठेकेदार यांनी पावासाची वाट पाहिली आणि २४ जुलै ते २७ जुलै दरम्यान जो मुसळधार पाऊस झाला त्याने इंद्रायणी, पवना मुळा मुठा या नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने त्याच्या पाण्याच्या प्रवाहात ही सगळी जलपर्णी पुराच्या पाण्यात वाहून गेली. आणि नद्या जलपर्णी मुक्त होऊन त्यांनी मोकळा श्वास घेतला.
दरवर्षी ही हीच ओरड आहे की कोट्यवधी रुपयांचे टेंडर निघून सुद्धा जलपर्णी काढण्यात का येत नाही ? मनपा प्रशासन यांना हे दिसत का नाही ? पत्रकार, जनता यांना दिसते पण मनपा प्रशासन यांना का दिसत नाही का ? का फक्त टेंडर काढण्यात मनपा प्रशासन यांना धन्यता वाटते ? नंतर ठेकेदार ते काम करतात की यावर लक्ष देणे त्यांची जबाबदारी नाही का ? गेल्या अनेक वर्षापासून चालू असणार हा खेळ प्रशासन राज्यात पण चालूच आहे ? आयुक्त साहेब , जरा आपण स्वतः लक्ष घाऊन अधिकारी, ठेकेदार यांचा करदात्या नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याच्या धंदा चालू आहे त्यावर जरब बसवावी.
यावर्षी तर आपण स्वतः शहरातील नदी किनारी असणाऱ्या परिसरात गेलात तेथील नागरिक यांना दिलासा देऊन मदत करण्यासाठीं प्रशासन यांना आदेश दिलेत, त्याची पाहणी केली. त्यावेळी नदीपात्रात जलपर्णी नसल्याचे आपणांस आढळून आले असेल. पण खरे पाहता ती जलपर्णी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.
ठेकेदारांची बिले अदा करू नयेत
सदर निवेदनाच्या माध्यमातून मा.आयुक्त साहेब , आपणांस विनंती करण्यात येत आहे की, पवना, इंद्रायणी, मुळा या नद्यातील जलपर्णी काढण्याच्या कामाला मनपा प्रशासन यांच्या वतीने निविदा प्रक्रिया राबवून किंवा काही ठिकाणी मुदतवाढ देऊन कामाचे आदेश देण्यात आले पण खरे पाहत जूनच्या सुरवातीस किंवा मध्यात हे काम पूर्ण होणे नद्या जलपर्णीमुक्त होणे अपेक्षित असताना आज जुन संपत आला तरी अनेक नदीपात्रात, नद्यात तसेच नद्यातून जलपर्णी वाहतं जाताना दिसून आली अनेक भागात नदीचे पात्र जलपर्णी ने भरलेले दिसून आले यातून खरच येवढे पैसे खर्च करून कोणत्या नद्यातील जलपर्णी ठेकेदार यांनी काढली हा प्रश्न उपस्थित होत आहे. (pcmc)
या कामाची आपण स्वतः पाहणी करून कामाच्या आदेशानुसार काम कधी पूर्ण होणे अपेक्षित असताना अजूनही काम का झाले नव्हते यांची उत्तरे संबंधीत अधिकारी यांच्याकडून मागवावी तसेच जे ठेकेदार आहेत त्या ठेकेदार यांच्यावतीने किती कोणत्या भागातील नदी पात्रातील जलपर्णी काढण्यात आली याची चौकशी करावी, तसेच कोट्यवधी रुपयांचे टेंडर निघून सुद्धा जलपर्णी निघाली नसल्याने संबधीत ठेकेदार यांचे बील अदा करण्याचे थांबवण्यात यावे, काम योग्य झाले नसल्याने संबधीत ठेकेदार यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येऊन योग्य ती कारवाई करण्यात यावी ? तसेच जलपर्णी काढण्याच्या कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाच्या आरोग्य पर्यवेक्षक किंवा संबधीत अधिकारी यांना कारणे द्या नोटीस बजावून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी विनंती करण्यात येत आहे. (pcmc)
पावसाने इंद्रायणी नदीला महापूर आला मात्र या पुरामुळे मोशी हद्दीतील नदीपात्रात असणारी जलपर्णी पुणे.नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या जुन्या पुलावरून वाहून गेली ( दि.२५ जुलै) याचा व्हिडिओ अनेक लोकांनी सोशल मीडिया वर पाठविला त्यानुसार अजूनही जलपर्णी ठेकेदार यांच्या वतीने काढण्यात आली नाही असे स्पष्ट होत आहे.
आत्ता ठेकेदार ही जलपर्णी आपल्या हद्दीतील नाही असे अनेक कारणे देतील तरी त्यांच्या त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश देण्यात येवून काम झाले नसेल तर त्याचे बिल अदा न करता त्याच्यावर आणि संबधीत अधिकारी यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात यावे. ( मागील वर्षी ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जलपर्णी चे काम यावर देखरेख ठेवण्यासाठी प्रशासन यांनी २५ लाख खर्च केले होते ते यावर्षी पण त्याची पाहणी केली असेल त्याची चित्रीकरण केले असेल त्याची तपासणी करावी जेणे करून खरच जलपर्णी काढण्याचे काम झाले आहे का नाही याची खात्री होईल.
संबंधीत जलपर्णी वाहून जात असलेला सोशल मीडिया वर प्रसिद्ध झालेला व्हिडिओ आपल्या माहितीसाठी सोबत जोडत आहे. तरी एक जबाबदार प्रशासन अधिकारी या नात्याने या कामाची योग्य ती चौकशी आपल्या वतीने करण्यात येईल आणि जर काम झाले नसेल तर त्याचे बिल अदा न करता संबधीत अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई होऊन जनतेचे कररुपी पैसै याची बचत होइल अशी आशा व्यक्त करत आहे.
असे राहुल कोल्हटकर यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
हेही वाचा :
मोठी भरती : भारतीय टपाल विभागात 44228 पदांची भरती; पात्रता 10वी पास
भावडांसोबत खेळताना दोरीचा फास लागून 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
ब्रेकिंग : शाहरुख खान उपचारासाठी अमेरिकेला रवाना होणार, वाचा कशाचा आहे त्रास !
मनू भाकर-सरबज्योत सिंग जोडीने इतिहास रचला, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले
वायनाडमध्ये भीषण भूस्खलन ; ४५ ठार, शेकडो नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
‘त्या’ प्रकरणात अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक
१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का
Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा
कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी
गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर