पिंपरी चिंचवड/क्रांतीकुमार कडुलकर :अभीसार फाउंडेशनच्या वाकड येथील “ऊर्जा “दिव्यांग मुलांची शाळा व कार्यशाळा मध्ये शनिवार दि. 9 मार्च 2024 रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी महिला पालक व महिला शिक्षकांसाठी फनी गेम च्या स्पर्धा घेण्यात आल्या.दम शिराज,रॅम्पवॉक, पदन्यास शर्यत,पावलांचा खेळ,अंताक्षरी,संगीत खुर्ची, अशा विविध कार्यक्रमाचा सर्व महिला पालकांनी आनंद घेतला.
महिला दिना निमित्ताने केक कापण्यात आला.पालकांना व विद्यार्थ्यांना केक आणि वेफर असा खाऊ वाटप करण्यात आला.महिला दिनाच्या या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी खूप आनंद घेतला.
या वेळी शाळेतील महिला शिक्षिका,सर्व मावशी यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संयोजन “अभिसार फॉउंडेशन”च्या सी ई.ओ किन्नरी शहा, शाळा प्रतिनिधी जाधव मॅडम,युगंधरा बर्वे महिला शिक्षिका भाग्यश्री कापसे,वैशाली खेडकर,हांडे मॅडम, देशमुख मॅडम,कांबळे मावशी,पटेकर व मारणे मावशी तसेच शाळेतील सर्व कर्मचारी वर्गाने केले होते.