Monday, May 20, 2024
HomeNewsPCMC:राज्यस्तरीय एकांकिका नाट्य स्पर्धेचे चिंचवडमध्ये उदघाटन

PCMC:राज्यस्तरीय एकांकिका नाट्य स्पर्धेचे चिंचवडमध्ये उदघाटन

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या जयंतीनिमित्त लोकनेते आमदार लक्ष्मणभाऊ जगताप कला क्रीडा अकादमी आणि भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धेचे आज उदघाटन करण्यात आले.

कै.मोरे नाट्यगृह येथे आयोजित केलेल्या या स्पर्धेचे उदघाटन सांस्कृतिक प्रकोष्ठ पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष विजय भिसे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र गावडे,भाजप सांस्कृतिक सेलचे संयोजक नरेंद्र आमले,सह संयोजक संजय हिरवे, नाट्यकलावंत जोगदंड, सतीश इंगळे, धनंजय भिसे आदी उपस्थित होते.

दिनांक १९ ते २१ या दरम्यान होणाऱ्या या लक्ष्मणभाऊ जगताप करंडक स्पर्धेत राज्यभरातील २७ नाट्य संघ सहभागी झाले आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना ३५ ह, २५ह., १५ ह, उत्तेजनार्थ १० ह तर लक्षवेधी नाट्य सादरीकरणास ७ ह असे बक्षी दिले जाणार आहे. दि. २१ रोजी संध्याकाळी ७:३० वा या स्पर्धेचे बक्षीस वितरण कै मोरे नाट्यगृहात होणार आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय