Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे महापालिकेच्या वतीने उद्घाटन

PCMC : जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे महापालिकेच्या वतीने उद्घाटन

पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंनी आपल्या उत्तम कामगिरीमुळे शहराच्या नावलौकिकात भर पाडण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे शहर औद्योगिकनगरी बरोबरच क्रीडानगरी म्हणून देखील नावारूपास आली आहे. असे सांगून जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी अजून चांगल्या स्तरावर पोहोचून पारितोषिके मिळवावी, अशा शुभेच्छा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी दिल्या. (pcmc)

पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हास्तरीय कॅरम असोसिएशन ऑफ पुणे यांच्या मान्यतेने तसेच नव प्रगती मित्रमंडळ यांच्या सहकार्याने कै.सो. मनीषा भोईर विरंगुळा केंद्र, प्रेमलोक पार्क, चिंचवड या ठिकाणी जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेचे उद्घाटन आज अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.


यावेळी क्रीडा विभागाचे सहाय्यक आयुक्त पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जयंत उर्फ अप्पा बागल तसेच नागरिक उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा दरवर्षी घेण्यात येते.

त्यानुसार सन २०२४-२५ या वर्षात ही स्पर्धा दिनांक २९ ते ३१ जुलै या कालावधीत सकाळी ९.०० ते रात्री ८.०० वाजेपर्यंत सुरु राहणार असून पुरुष गट, महिला गट, ज्येष्ठ नागरिक गट या तीन गटात होणार आहे. या स्पर्धेच्या विजेत्यांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. (pcmc)

या स्पर्धेतील पुरुष गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यास ५१ हजार रुपये , द्वितीय क्रमांक ४१ हजार रुपये, तृतीय क्रमांक ३१ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक २१ हजार रुपये, पाचवा क्रमांक १५ हजार रुपये, सहावा क्रमांक १५ हजार रुपये, सातवा क्रमांक ११ हजार, आठवा क्रमांक ११ हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

तसेच महिला गटात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या महिलेस १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांक ११ हजार रुपये, तृतीय क्रमांक ७ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ५ हजार रुपये, पाचवा क्रमांक ३ हजार, सहावा क्रमांक ३ हजार, सातवा क्रमांक ३ हजार, आठवा क्रमांक ३ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक गटातील प्रथम क्रमांक पटकावणाऱ्यास २१ हजार रुपये, द्वितीय क्रमांक १५ हजार रुपये, तृतीय क्रमांक ११ हजार रुपये, चतुर्थ क्रमांक ७ हजार रुपये, पाचवा क्रमांक ५ हजार रुपये , सहावा क्रमांक ५ हजार रुपये, सातवा क्रमांक ५ हजार रुपये, आठवा क्रमांक ५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ओलंपिकमध्ये बलराज पंवारचे चमकदार प्रदर्शन, एकल स्कल्स हीटमध्ये चौथा क्रमांक

१० मीटर एअर रायफल मिश्रित स्पर्धेत भारताला धक्का

Typhoon : ‘गेमी’ चक्रीवादळ; फिलिपाईन्स, तैवान चीनमध्ये तडाखा

कोल्हापूर शहरात महापूर – 5,800 लोक सुरक्षित स्थळी

गुजरातमधून तडीपार झालेल्यांनी… शरद पवार यांचे अमित शाहांना चोख प्रत्युत्तर

दिग्दर्शक फराह खान यांच्या आई मेनका इराणी यांचे निधन

ब्रेकिंग : गौरी गणपती उत्सवानिमित्त मिळणार ‘आनंदाचा शिधा’

संबंधित लेख

लोकप्रिय