Friday, November 22, 2024
HomeNewsPCMC:महापालिका क्रिकेट संघाचा फायनल मॅच मध्ये प्रवेश

PCMC:महापालिका क्रिकेट संघाचा फायनल मॅच मध्ये प्रवेश

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:औद्योगिक टी ट्वेंटी 2024 क्रिकेट स्पर्धा मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रिकेट संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करून स्पर्धेमध्ये सलग सहा सामने जिंकून थेट अंतिम सामन्यांमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे,, आज सकाळी टेल्को मैदान नेहरूनगर या ठिकाणी पिंपरी चिंचवड पालिका संघ व ऍमिशन फॅक्टरी संघ यांचा उपांत्य फेरी चा सामना होता,, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी केली ऍमिशन फॅक्टरीने 20 षटकामध्ये 170 धावांचा डोंगर उभा केला होता,, त्यामध्ये प्रतीक रोकडे याने 70 धावा, सचिन सारवाण यांनी 35 धावा, विकास कांबळे यांनी 21 धावा केल्या,, पीसीएमसी संघाकडून गोलंदाजी मध्ये गणेश कापसे ने 3 गडी, सचिन लोणे 2 गडी, विकास शिरवळे व विपिन थोरमोटे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले,, 171 धावांच्या प्रत्युत्तर मध्ये पीसीएमसी संघा कडून राहुल चावरिया व सचिन लोणे यांनी 8 षटकामध्ये 70 धावांची सलामी देऊन संघाला चांगली सुरुवात करून दिली, सचिन लोणे हा 36 धावा काडून बाद झाला, पलाश शिंदे 39 धावा काढून बाद झाल्यानंतर कर्णधार राहुल चावरिया यांनी जबाबदारी हाती घेऊन 48 चेंडू मध्ये आक्रमक नाबाद 62 धावा केल्या त्यामध्ये 3 चौकार तर 2 उत्तुंग षटकार खेचुन सामना 5 चेंडु शिल्लक ठेवून 171 धावांचा पाठलाग करून स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे, राहुल चावरिया याला निखिल आव्हाड तसेच ओंकार कहाने यांनी फलंदाजी मध्ये चांगली साथ दिली,, सामन्यामध्ये सचिन लोणे, राहुल चावरिया यांना सामनावीर चा पुरस्कार मिळाला. अंतिम सामना उद्या सकाळी दहा वाजता आकुर्डी बजाज ऑटो ग्राउंड वर टाटा मोटर्स यांच्यासोबत होणार आहे.. खेळाडू यांनी खेळामध्ये घवघवीत यश मिळवून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नावलौकिक करीत असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील कर्मचारी अधिकारी यांच्या कडून सर्व खेळाडूंना अंतिम सामना साठी भरभरून शुभेच्छा मिळत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय