Monday, May 20, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : औषध व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान, दवा बाजार भारनियमनातून वगळा मधुकर बच्चे

PCMC : औषध व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान, दवा बाजार भारनियमनातून वगळा मधुकर बच्चे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : चिंचवड स्टेशन माल धक्का येथे दवा बाजार म्हणून परिसर ओळखला जातो या ठिकाणी ठोक (होलसेल् )औषधे व्यावसायिक आहेत. अनेक प्रकारची महत्वाची औषधे फ्रिज मध्ये साठवावी लागतात, परंतु अनेक वेळा 4 ते 5 तास विद्युत पुरवठा खंडित होतो. त्यामुळे येथील व्यावसायीकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे जेनरेटर किंवा इन्वर्टर चालवावा लागतो, पण अनेक वेळा ते ही अचानक नादुरुस्त होतात, त्यामुळे मोठी समस्या निर्माण होते.

या मार्केट मधून पिंपरी चिंचवड शहर व लोणावळा पर्यंत तसेच उपशहरला औषधे पुरवठा केला जातो यातील अनेक औषधे कोल्ड स्टोरेज थंडपणा साठी साठवावी लागतात. परंतु अनेक वेळा 5 ते 6 तास विद्युत पुरवठा खंडित होतो त्यामुळे मोठी अडचण होते. विशेष म्हणजे काहीही कारण नसताना प्रत्येक गुरुवारी विद्युत पुरवठा 3 ते 4 तास बंद असतो हे चुकीचे आहे व नियम बाह्य आहे. दवा बाजार चिंचवड भागातील विद्युत पुरवठा कायम सुरळीत ठेवावा व प्रत्येक गुरुवारचा अनधिकृत भारनियमन बंद करावा, अशी मागणी महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी महावितरण आकुर्डी अभियंता अशोक जाधव यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष रवी पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे, केमिस्ट असो. उपाध्यक्ष विवेक तापकीर, सचिव चेतन सिंघवी, दिपक सोनवणे, आदीं पदाधिकारी व व्यापारी यांनी महावितरण कार्यालय आकुर्डी येथील बैठकीत औषध विक्रेत्यांच्या समस्या सांगितल्या. चिंचवडस्टेशन भागातील व्यापारी व पिंपरी चिंचवड केमिस्ट असोसियशन वतीने महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचेही ठरले होते.

महाराष्ट्र महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांनी मध्यस्थी करून आकुर्डी aभियंता अशोक जाधव यांच्याशी संपर्क करून दिला व मोजके शिष्ट मंडळ व अधिकारी अशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून निवेदन द्यायचे ठरले त्या नुसार आकुर्डी आभियंता अशोक जाधव व पल्लवी देशपांडे मॅडम यांच्याशी सविस्तर चर्चा केली. गुरुवारी विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची पूर्ण काळजी घेतली जाईल तसेच या भागातून अशी तक्रार आल्यास यास प्रामुख्याने प्राधान्य दिले जाईल असे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय