Friday, May 17, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : चांद्रयान - o३ च्या यशस्वी लँडिंगमुळे ढोल ताशा वाजवून आनंद...

PCMC : चांद्रयान – o३ च्या यशस्वी लँडिंगमुळे ढोल ताशा वाजवून आनंद उत्सव संपन्न

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर चंद्रयान ०३ यशस्वीरित्या उतरविण्यात भारतीय शास्त्रज्ञ यशस्वी झाले, याचा अभिमान साऱ्या देशातील संपूर्ण देशवासिया असल्याचे निदर्शनास येत आहे. कृष्णानगर, चिंचवड येथे सचिन सानप युवा मंच, शंभूराजे ढोल ताशा पथक व युवासेना (उबाठा) भोसरी विधानसभा वतीने चंद्रयान तीनच्या यशस्वी लँडिंग नंतर कृष्णानगर येथे ढोल ताशा वाजून व फटाके उडवून साजरा केला व इस्रोचे शास्त्रज्ञ व देशवासीयांना शुभेच्छा व्यक्त केले.



याप्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख युवासेना सचिन सानप यांनी भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी… इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे.

भारतातील १४० कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे. ऊर आनंदाने भरून आला आणि प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय… गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा.. कारण, भारताच्या चंद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलं आहे. इस्रोचं चांद्रयान-३ चंद्राच्या कुशीत शिरलं आहे. हे यश भारतीय तंत्रज्ञानाचे, भारतीय शास्त्रज्ञांचे, भगवंताच्या कृपाशीर्वादाचे व १४०कोटी लोकसंख्येच्या शुभकामनांचे आहे. यापुढेही भारतीय शास्त्रज्ञांनी विविध खगोलशास्त्रीय शोध लावत इस्रोचा नावलौकिक संपूर्ण विश्वात अजरामर करावा अशी प्रार्थना केली.

याप्रसंगी युवा सेना शहरप्रमुख अजिंक्य उबाळे, अमित शिंदे उपजिल्हाप्रमुख, उपशहर प्रमुख शैलेश मोरे, उपशहर प्रमुख अनिल सोमवंशी, ज्येष्ठशिवसैनिक सर्जेराव भोसले, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद चौगुले, योगेश सानप, चेतन नाईक, बंटी काटे, राहुल ढवळे, बाळू सूर्यवंशी , राकेश सानप आदीसह युवासैनिक, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय