Sunday, May 19, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC:चिखली प्राधिकरण येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव

PCMC:चिखली प्राधिकरण येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आनंदोत्सव

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२२-श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,चिखली प्राधिकरण,पेठ क्र.१६,राजे शिवाजीनगर येथे बाल कलाकारांनी प्रभू श्रीराम राज्यभिषेक सोहोळ्याचा सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.
येथील बालसंस्कार केंद्रातील बाल कलाकारांनी राम कथेतील भक्ती गीते सादर केली.
बाल कलाकार वैष्णवी बिर्ले,अलका गरुड,गायत्री तावस्कर,मयूर पोळ,समर्थ तावस्कर,पूर्वा भोंग,रुद्र शिंदे,गौरी जमदाडे आदींनी प्रभू श्रीरामाचा राज्याभिषेक सोहळा व श्रीराम भजन भक्ती गीते सादर केली.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे दिंडोरी नाशिक,चंद्रकांत मोरे सतीश मोटे यांच्या प्रेरणेतून सेवेकरी अशोक जाधव,दिलीप संन्यासी,धनंजय जाधव,अक्षय वीरकर,महेश पोळ,विश्वनाथ पवार,देविदास भाऊ,संजय हजारे,बंडू जमदाडे,सरोज दाणी,योगेश पाटील,प्रशांत कुमावत,राम खेताडे,पंकज जडे सचिन थोरवे,रामेश्वर निकम,संजय मामडगे,संतोष खिरे,कुलदीप राठोड,विष्णू पोळ,शिवाजी केदारी,संदीप लोहार,प्रितेश जमदाडे,गोरक्षनाथ काकडे,शिवाजी साधुले,सुनील आदक विनोद हारगे यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय