Friday, November 22, 2024
HomeNewsPCMC:आकुर्डीच्या डी वाय पाटील वास्तूशास्त्र कॉलेजमध्ये बिल्टेक कार्यशाळा

PCMC:आकुर्डीच्या डी वाय पाटील वास्तूशास्त्र कॉलेजमध्ये बिल्टेक कार्यशाळा

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:बांधकाम क्षेत्रातील तांत्रिक विषय समजून घेण्यासाठी बिल्टेक हि कार्यशाळा एक आगळावेगळा शैक्षणिक प्रयोग आहे.आणि तो विषय आपण राष्ट्रीय स्तरावर जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.असे मत वास्तुकला परिषदेचे अध्यक्ष अभय पुरोहित यांनी व्यक्त केले.

आकुर्डी येथील पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील वास्तुशास्त्र महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “बिल्टेक २०२४” या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे संचालक रेअर ॲडमिरल अमित विक्रम,वित्त अधिकारी बिपीन शर्मा,प्राचार्य धनंजय चौधरी,उप प्राचार्या छाया चव्हाण- तिरवीर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी “बिल्डिंग कन्स्ट्रक्शन” आणि “बिल्डिंग सर्व्हिसेस” या विषयीच्या कार्यशाळेत वास्तुकला सर्जनशिलतेचे (आर्किटेक्चर क्रिएटिव्हीटी) परीवर्तन वेगवेगळे साहित्यसामुग्री व तंत्र वापरून प्रतिकृती बनविणे,यांचा अस्मरणीय अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.डिझाईन प्रक्रिया समजण्यासाठी “बिल्डिंग कन्स्ट्रक्शन” आणि “बिल्डिंग सर्व्हिसेस” हे विषय महत्त्वाचे असल्याने कार्यशाळा घेतली.
विद्यार्थ्यांची सर्जनशिलता (क्रिएटिव्हीटी) व तांत्रिक (टेक्नीकल) विषय समजून घेण्यासाठी तांत्रिक विषयांतील अभ्यासक्रमाच्या प्रतिकृती बनविण्याच्या या उपक्रमांची सुरूवात २०१४ रोजी कार्यशाळेच्या संयोजिका उपप्रचार्य आर्किटेक्ट छाया चव्हाण – तिरवीर यांनी केली.
यावेळी उपप्राचार्य छाया तिरवीर म्हणाल्या कि,
कौशल्य विकासासोबत ज्ञान रूजविणे हा संस्थेचा दृष्टीकोन साधन्यासाठी हा उपक्रम महत्वाचे माध्यम आहे.
विद्यार्थ्यांचा एकंदरीत आत्मविश्वास,कौशल्य विकास,संघभावना,प्रतिकृती बनविण्याचे तंत्र विकसित करण्यासाठी हा उपक्रम एक महत्वाचे व्यासपीठ आहे.असे प्राचार्य आर्किटेक्ट धनंजय चौधरी म्हणाले.
कार्यशाळेमध्ये तयार केलेल्या प्रतिकृतींचा “निर्माण” या स्पर्धेमध्ये समावेश करण्यात आला. या कार्यशाळेमध्ये प्रतिकृती बनिविण्यासाठी विषयांची निवड ही अभ्यासक्रमातून होते आणि मोजमापासहित प्रतिकृती तयार केली जाते, यामुळे प्रायोगिक प्रतिबद्धतेदवारे शिकण्याची व शिकवण्याची प्रक्रिया सुलभ होते.
शिक्षक आणि आर्किटेक्ट यांनी महाविद्यालयीन तसेच बाह्य विद्यार्थ्यांच्या प्रतिकृतींचे परीक्षण केले. या उपक्रमामध्ये महाविद्यालयातील सर्व शिक्षकांचा मोलाचा वाटा असल्यामुळे हा उपक्रम म्हणजेच एक अप्रतिम कार्यशाळा,स्पर्धा व प्रदर्शन ठरले.

संबंधित लेख

लोकप्रिय