महाविकास आघाडीकडून आंबेडकर चौकात मूक निदर्शने आंदोलन (PCMC)
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : बदलापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, पुणे, नाशिक, कोल्हापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आज शनिवार दि- २४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी दहा वाजता पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून आणि हातात काळे झेंडे घेऊन भर पावसामध्ये महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. (PCMC)
त्या अत्याचारी नराधमास फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे. सध्याच्या सरकारमध्ये गृहखातं पूर्णपणे झोपलेले असल्याचे दिसून येते. या अत्याचारांच्या घटनांबाबत सरकार अत्यंत असंवेदनशील असून राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.
भारतीय संविधान व न्यायव्यवस्था यांचा आदर करणारे आम्ही लोक आहोत, त्यामुळे राज्यव्यापी बंद न करता निषेध आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. परंतु या सर्व अत्याचारांच्या घटनांची नैतिक जबाबदारी स्वीकारून सरकारने पायउतार व्हावे.
महाविकास आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराचे समन्वयक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रवी यादव, अजित गव्हाणे, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, प्रदीप पवार, डॉ. मनीषा गरुड, दिलीप काकडे, माजी नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, गणेश भोंडवे, संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे, वैभव जाधव, विनायक रणसुभे, सुनिता शिंदे, मागील महापौर कविता यांच्यासह सर्वच पक्ष व सामाजिक संघटनांच्या महिला पदाधिकारी तसेच, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा :
मोठी बातमी : महाराष्ट्र बंदला न्यायालयाकडून ब्रेक, महाविकास आघाडी निषेध नोंदवणार
शरद पवार यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा, पवारांनी व्यक्त केली शंका
Accident : नेपाळ बस अपघात, ४० भारतीय प्रवाशांना जलसमाधी, १४ ठार
धक्कादायक : बदलापुरनंतर कोल्हापूरमध्ये दहा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून खून
MPSC : एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय; विद्यार्थ्यांच्या आंदोलनास यश