Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : भटक्या विमुक्त जनजाती समूहाचे संघटन करण्यासाठी देशभ्रमण करणारा अवलिया संजय...

PCMC : भटक्या विमुक्त जनजाती समूहाचे संघटन करण्यासाठी देशभ्रमण करणारा अवलिया संजय कदम एक भारतीय यांचा कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सत्कार

पिंपरीचिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर: दि.१ – भटक्या विमुक्त नागरिकांसाठी अविरत कार्य करणारे संजय कदम एक भारतीय हे भटके विमुक्त जाती – जनजाती जोडो अभियानद्वारे २२ राज्यात दुचाकी वरुन २ लाख किलोमीटर दौरा करून सुमारे २ कोटी लोकांशी संपर्क साधून वेळ प्रसंगी पाला वस्तीवरच राहीन त्यांच्या सुखदुःखात सामील होऊन त्यांना असलेल्या अडीअडचणी सरकारपर्यंत पोहोचून त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी आंदोलन मोर्चा काढून त्यांना न्याय देण्याचे काम ७ वर्षांपासून देशभरात करत असून २१८ भटके विमुक्त जाती- जनजाती त्यांचे शैक्षणिक , आर्थिक, सामजिक सर्वेक्षण करत आहेत. ते आज पिंपरी चिंचवड येथे आले असता त्यांची कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे चिंचवड येथील कार्यालयात कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल शहर अध्यक्ष भाई विशाल जाधव, विशाल क्षिरसागर, संतोष कदम सलीम डांगे,उमेश डोर्ले, रवींद्र गायकवाड, रणजित गायकवाड आदी उपस्थित होते.


यावेळी नखाते म्हणाले की भटक्या विमुक्त लोकांचा आधार म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन , आणि व्यसनातून मुक्त करण्याचा प्रयत्न संजय कदम करीत आहेत त्यांना भेटून देशभरातील भटक्या विमुक्त त्याचबरोबर कारागीर आणि असंघटित कामगारांचे प्रश्न जाणून घेता आले आणि राष्ट्रीय स्तरावरती असंघटित कामगारांच्या बाबतीत होणाऱ्या बैठका मिळावे याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच दिल्ली येथे एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे, यासाठी संजय कदम आणि राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष यांच्या माध्यमातून असंघटित कामगारांची सामाजिक सुरक्षाबाबत पाठपुरावा केला जाणार आहे.


भाई विशाल जाधव म्हणाले की भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झालेले असून संजय कदम यांच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झालेली आहे त्यांचे सोबत महाराष्ट्रामध्ये आम्ही भटक्या विमुक्त व ओबीसी समाजाला एकत्रित घेऊन एक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय