Friday, May 3, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडPCMC : मोफत उपचाराचा शुभारंभ: मानवतेला डोळ्यांसमोर ठेवून कार्य : यशवंत कण्हेरे

PCMC : मोफत उपचाराचा शुभारंभ: मानवतेला डोळ्यांसमोर ठेवून कार्य : यशवंत कण्हेरे

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर : दि.०१-माणसाने माणसांना मदत करायला हवे, मानवतेला जिवंत ठेवायला हवे, त्यानुसार मानवतेला डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर राजेश फुलफगर यांच्या मदतीने महात्मा फुलेनगर येथे ओम शांती गंगा ज्येष्ठ नागरिक संघ आयोजित मोफत ओपीडी सुरू करण्यात आली आहे, त्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर डॉक्टर राजेश फुलफगर, डॉक्टर मनीष धकाते, डॉक्टर एम डी रूपटक्के, चांगदेव कोलते, राधाकिसन चौधरी, सचिन सानप, योगिताताई नागरगोजे, प्रदीप सकपाळ व. धनंजय अल्हाट आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.



विश्वास सोहोनी म्हणाले, चिखली भागात कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना मोठ्या खासगी दवाखान्यात जाऊन उपचारासाठी लाखो रुपये मोजणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना कमीत कमी दरात चांगली वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने ओम शांती गंगा जेष्ठ नागरिक संघाने पुढाकार घेतला व प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी ११ते ०१ या वेळेत विरंगुळा केंद्रात ओपीडी मोफत सुरू करण्यात आली आहे.


यावेळी शिवानंद चौगुले म्हणाले, आपण समाजाचे देणे लागतो या विचारसरणीतून संघाच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबविले जात आहेत. भविष्यात मोफत नेत्र तपासणी ओपीडी सेवा सुद्धा करणार आहोत. गरजूंसाठी भविष्यात खूप काही करायचे आहे असेही ते म्हणाले. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाला शुभारंभ केला. शिवानंद चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले. यशवंत कण्हेरे यांनी प्रास्ताविक केले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय