शिवतेजनगर, चिंचवड येथे महिलादिनी प्रेरणादायी व्याख्यान
पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : शिवतेज नगर, चिंचवड येथे श्री स्वामी समर्थ महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कर्तुत्वान महिलांचा सन्मान व प्रा. शैलजाताई सांगळे यांचे “आनंदी जीवनाचा मार्ग” या विषयावर व्याख्यान झाले. (PCMC)
कार्यक्रमाचे अध्यक्षा उद्योजिका पुष्पा बोत्रे ह्या होत्या. प्रमुख उपस्थितीत तारामती बहिरवाडे, मनीषा देव शोभा नलगे होत्या. दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून व्याख्यानाची सुरुवात करण्यात आली. (PCMC)
यावेळी शैलाजा सांगळे यांनी महिला दिनाचा इतिहास सांगून त्या पुढे म्हणाल्या की, आज आपल्यापैकी प्रत्येकाला वेळोवेळी अनेक समस्येचा सामना करावा लागतो. त्यातील बऱ्याच समस्या आर्थिक असतात, आपण आपल्या मूलभूत गरजा पेक्षा चैन, विलासी,अतिरिक्त कपडे, दागिने खरेदी यामध्ये आपला पैसा खर्च करत असतो, या भौतिक जगात चांगले अन्न, शिक्षण, एखादे घर, आरोग्य विमा या व्यतिरिक्त इतरत्र आपण पैसा खर्च करू नये,आपला देश अध्यात्मिक व दानधर्म करून पुण्य मिळवणारा देश आहे,अध्यात्मिक प्रार्थना, भक्ती यातून खरा आनंद मिळतो.
फिनलंड, डेन्मार्क, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे, स्विझरलँड, न्युझीलंड आणि आपल्या शेजारचा भूतान हे आनंदी देश आहेत, कारण त्यांनी त्यांची जीवनशैली निसर्ग व सीमित भौतिक गरजेपुरती मर्यादित ठेऊन सर्व क्षेत्रात अग्रस्थानी आहे, अशा आनंदी देशाच्या यादीत भारताचे नाव नाही, कारण आपण अति भोगवादी झालो आहोत, त्यासाठी भक्तिमार्ग महिलांनी स्वीकारावा त्यामुळे संपूर्ण सुखी होईल. (PCMC)
आरोग्याच्या समस्या, नातेसंबंधातील समस्या, इत्यादी समस्या बाबत महिलांमध्ये गटचर्चा आयोजित करण्यात आली होती. या प्रेरणादायी व्याख्यानाचे सर्व महिलांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.
महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सारिका रिकामे यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकामध्ये त्या म्हणाले यावर्षीपासून महिला दिन साजरा करीत असताना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलेला कर्तुत्वान पुरस्कार देण्यात येणार आहे.
यामध्ये अपंगासाठी काम करणाऱ्या संगीता जोशी, कारसेविका म्हणून सुनंदा सानप व व आरोग्य विभागातील महिला कर्मचारी अनुसया वाघमारे इ. इतरांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे साफला सुरुवात करण्यात आली. आराध्या कोरे यांनी गणेश स्तवन सादरीकरण करण्यात आले.
शिववंदना व अंजली देव यांच्या ग्रुपने सुंदर समूह नृत्य सादर केले.पुनम दवडे अर्चना पाटील यांनी फॅशन शो सादर केला.सेवेकरी ग्रुप मधील क्षमा काळे, अश्विनी केवडकर, छाया महाजन, केतकी वझे यांनी इतिहासातील कर्तृत्ववान महिलांची वेशभूषा करून सुंदर असं सादरीकरण केले यामध्ये झाशीची राणी राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, सरोजिनी नायडू, महिला डॉक्टर महिला वकील.इ वेशभूषा करून अभिनय केला.
जेष्ठ नागरिक महिलांनी देखील आपली कला या ठिकाणी सादर केली. याचबरोबर अनेकांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. पुष्प बोत्रे यांनी अध्यक्ष भाषणात महिला मंडळाचा चांगल्या उपक्रमाबद्दल गौरव केला.
कार्यक्रमाचे संयोजन महिला मंडळाच्या कार्याध्यक्ष सारिका रिकामे उपाध्यक्ष अंजली देव, क्षमा काळे, नीलिमा भंगाळे, गीतांजली पाटील, स्नेहल खडके, प्रीती झोपे, सविता राणे, मंगल काळे, मोहिनी शिराळकर, मनीषा भडांगे, सुनिता वायाळ, अर्चना पाटील, अश्विनी केवाडकर, केतकी वझे, कांचन नारखेडे, अश्विनी कोरे, नम्रता निरपळ, दिपाली योगी इ. नी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माही चौरे यांनी केले. कांचन नारखेडे यांनी आभार मानले. पंचक्रोशीतील महिलांनी कार्यक्रमासाठी खूप गर्दी केली होती.
हे ही वाचा :
ब्रेकिंग : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात महत्वाची घडामोड
बाबा रामदेव यांना झटका; सर्वोच्च न्यायालयाची अवमान नोटीस
Police Bharti : पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता !
Pune : कांद्याच्या दरात घसरण; शेतकरी हवालदिल
मोठी बातमी : सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला पुन्हा धरले धारेवर
अजमेर मध्ये रेल्वेचा भीषण अपघात, ४ डबे रुळावरून घसरले रुळही उखडले