Sunday, May 19, 2024
Homeताज्या बातम्याPCMC:दडपशाही केली तरी दिल्लीत आंदोलन यशस्वी होईल - काशिनाथ नखाते.

PCMC:दडपशाही केली तरी दिल्लीत आंदोलन यशस्वी होईल – काशिनाथ नखाते.

राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाकडून दिल्ली येथील शेतकऱ्यांना पाठिंबा


केंद्र व राज्य भाजप सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय


पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:दि.२४ – शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभावाच्या कायद्यासह ईतर मागण्यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले असून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना हरियाणा सीमेवरच रोखण्यात आले दरम्यान २ दिवसात २ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला ड्रोनद्वारे अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आल्या, बॅरिकेटसह सिमेंटचे गट्टूही बसवण्यात आले हे सर्व अडथळे पार करून शेतकरी या आंदोलनात यशस्वी होतील असा विश्वास राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यानी व्यक्त केला.

नवी दिल्लीत यापूर्वी एक वर्षापेक्षा अधिक काळ हे आंदोलन झाले,त्यादरम्यान केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्याला चिरडून मारले होते. सदरच्या आंदोलनाच्या दरम्यान ७४० पेक्षा अधिक शेतकऱ्यानी तेथेच आपले प्राण सोडले होते. दिल्ली येथे ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांपुढे अखेर सरकार झुकले आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्या व कायदा मामागे घेत असल्याचे खुद्द पंतप्रधान यांनी जाहीर केले .मात्र आजही त्यांच्या मागण्या मान्य केल्याची अजूनही पत्र अथवा आदेश काढण्यात आलेले नाही. म्हणून शेतीमालाला हमीभावाचा कायद्यासह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी मंजूर व्हाव्यात या व इतर मागण्यासाठी रास्त आंदोलन करत असून सप्टेंबर २०२० मध्ये कृषी विषयक तीन कायदे बहुमताच्या जोरावर मंजूर करून घेतले आणि देशातील शेतकऱ्यांनी उग्र आंदोलन पुकारले होते, आता पुन्हा एकदा ६ महिन्याचे खाद्य साहित्य सोबत घेऊन शेतकरी पुन्हा दिल्लीकडे कूच केली आहे या आंदोलनादरम्यान शुभकिरण सिंग व दर्शन सिंग या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. कदाचित शेतकऱ्यांना गोळीद्वारे बंदुकीच्या गोळीद्वारे मारण्यात येईल मात्र कदापी आंदोलक परत फिरणार नसून शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाही, महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यावर राज्य सरकारकडून खूप मोठा अन्याय केलेला असून आजही महाराष्ट्रात अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत. कांद्यावरील निर्यात शुल्क असो अथवा शेतीमालाला हमीभाव असो तो मिळत नाही शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे नापिकी व दुष्काळामुळे अनेक गंभीर समस्या शेतकऱ्यासमोर आहेत. शेतकरी येणाऱ्या निवडणुकीत याचा जाब सरकारला विचारतील.
यावेळी प्रदेश सचिव तुषार घाटोळे,निमंत्रक नाना कसबे,सलीम डांगे,अरुण जाधव,राजेश माने, विकास माने,सुधीर कांबळे,मनोज यादव,तुषार मोरे,अर्चना कांबळे,सविता जाधव,वनीता कदम आदी उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय