पिंपरी चिंचवड – बुधवार दि. 23/10/2024 रोजी ‘ नव क्षितिज संस्थेतर्फे डॉ. नीलिमा देसाई करंडक’ दिव्यांगांच्या आंतरशालेय नाट्य स्पर्धा भरत नाट्य मंदिर पुणे येथे पार पडल्या. या वेळी “अभिराज फाउंडेशन, वाकड येथील ऑटिझम मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी ” झाडे लावा, झाडे जगवा “हे नाटक सादर केले. (PCMC)
यावेळी झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल प्रेक्षकांनी दाद दिली. या नाटकाला अंतर शालेय नाट्य स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाला. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते. वैशाली खेडेकर तर सहाय्य केले होते. (PCMC)
योगिता वंजारी, विद्या रुपनाळकर. विनायक जुनवणे यांनी तर संगीत दिले होते. ऋषिकेश मुसूडगे यांनी नाटकांमध्ये अभिनय केला होता शिवानंद मणीकरी, संतोष कोळी, समर्थ शेटे, आरुष धायगुडे, एकाश जोशी, सृष्टी आढाव, आराध्य ससाने या दिव्यांग विद्यार्थ्यांनी या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता चव्हाण, डायरेक्टर स्वाती अभिजीत तांबे व रमेश मुसूडगे व पालकांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले आहे.