पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे ‘विद्यार्थी विकास मंडळ’ हे दरवर्षी पुणे शहरी, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेली आणि मान्यताप्राप्त परिसंस्था यांनी प्रत्येकवर्षी प्रकाशित केलेल्या महाविद्यालयाच्या नियतकालिकांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होते. (pcmc)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या ‘विद्यार्थी विकास मंडळ’ यांनी सन 2022-2023 या वर्षीच्या अव्यावसायिक विभागातून पुणे शहर स्तरावरील ‘कमला शिक्षण संस्थेच्या प्रतिभा वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालय चिंचवड’ या महाविद्यालयाच्या ‘दीप-प्रतिभा’ वार्षिक नियतकालिकास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘संत ज्ञानेश्वर सहभागृहात विद्यापीठाचे रजिस्टार प्रा.डॉ. विजय खरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी, राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य डॉ. सदानंद भोसले, डॉ. नितीन घोरपडे आणि इतर मान्यवर यांच्या हस्ते कमला शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा, प्रतिभा वाणिज्य आणि संगणकशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज, कला व मानव्यविद्या शाखा प्रमुख डॉ. रूपा शहा, महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालिका प्रा. ऋतुजा चव्हाण नियतकालिक दीप प्रतिभाच्या संपादिका प्रा.अमिता देशपांडे व सदस्य डॉ.दिनेश लाहोरी, डॉ. अनुराधा घोडके यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्रक आणि धनादेश प्रदान करण्यात आला. (pcmc)
‘दीप-प्रतिभा’ नियतकालिकास प्रतिभा ग्रुपचे प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. नियतकलिकेचा मराठी विभाग प्रा. अमिता देशपांडे, हिंदी विभाग प्रा. डॉ. रवींद्र निरगुडे, इंग्रजी विभाग प्रा. मधुरा वाघ यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन लेख, कविता लिहून घेतल्या. फोटो विभागाचे कामकाज प्रा. चंद्रकांत सोनवणे व प्रा.दिनेश सोनवणे यांनी पाहिले. (pcmc)
महाविद्यालयातील सर्व विभागांचा तपशील डॉ. दिनेश लाहोरी यांनी तयार केला. तर महाविद्यालयातील सर्व समित्यांचा अहवाल प्रा. वैशाली साठे, प्रा. श्रद्धा भिलारे, प्रा. अपराजिता कडवेकर, प्रा. अमोला जेऊरे यांनी प्रा. डॉ. अनुराधा घोडके यांना देऊन त्यांनी लेखन केले. अक्षरजुळणी व मुद्रक मधुकर शिंदे यांचे बहुमोल सहकार्य लाभले. (pcmc)
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजित कुलकर्णी यांनी तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रजिस्टार डॉ. विजय खरे मार्गदर्शन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संलग्न 1000 पेक्षा अधिक महाविद्यालये नियतकालिका स्पर्धेत सहभागी होतात.
या कार्यक्रमास 700 हून अधिक पुणे शहर, पुणे ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक इत्यादी जिल्ह्यातील व्यावसायिक आणि अव्यावसायिक महाविद्यालयाचे संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.