Sunday, May 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडघरकुल मधील नागरिकांच्या समस्या कडे लक्ष द्या-अशोक मगर यांची जनसंवाद सभेत मागणी

घरकुल मधील नागरिकांच्या समस्या कडे लक्ष द्या-अशोक मगर यांची जनसंवाद सभेत मागणी

पिंपरी चिंचवड/दि.२७- पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी जनसंवाद सभा पार पडली. घरकुल मधील समस्या विषयी सामाजिक कार्यकर्ते अशोक मगर यांनी वेगवेगळ्या तक्रारी मांडल्या यामध्ये प्रामुख्याने भामा आसखेड धरणाची पाईपलाईन केल्यामुळे संबंधित रस्ता खराब झालेला आहे तो डांबरीकरण करून देणे बाबत विचारले असता पुढील काही दिवसात सदर काम मार्गी लागेल असे आश्वासन दिले तसेच घरकुल मधील सध्या भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाविषयी तक्रार केली असता व वाढीव बिल आलेबाबतचे तक्रारीबाबत विचारणा केली असता सदर पाण्याचे काम घरकुल मध्ये चालू आहे नियोजन करण्यात येईल असे माहिती दिली.

घरकुल मधील ड्रेनेज लाईन बाबत तक्रार केल्यानंतर संबंधित भागातील चोको प करण्याचे काम चालू आहे असे सांगितले.
शरद नगर मधील भुयारी मार्ग या या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होऊन जाम होते त्यामुळे अपघात होत आहेत याबाबत विचारले असता याबाबत लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय