Thursday, April 25, 2024
Homeसंपादकीयकव्हर स्टोरीदेशातील LIC, SBI,पेंशनचा पैसा अदानी उद्योगसमूहात का गुंतवला जातोय?

देशातील LIC, SBI,पेंशनचा पैसा अदानी उद्योगसमूहात का गुंतवला जातोय?

राहुल गांधींच्या ‘आरपारची’ लढाईमूळे मोदी सरकार हैराण

हिंडेंबर्ग अहवालानंतर संपूर्ण मोदी-अदानी उद्योग समूहाच्या मधुर आर्थिक संबंधाबद्दल देशात व परदेशात खूप मोठी चर्चा सुरू आहे व खळबळ उडाली आहे.२०१४ पासून मोदी सरकारने एका उद्योगसमूहाला पूरक आर्थिक नीती राबवली हे आता स्पष्ट होत आहे.नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून गौतम अदानी उद्योगसमूहाला विशेष सवलती देण्यात आल्या.स्वातंत्र्याच्या सात दशकात भारतातील अनेक नामवंत उद्योगपतीनी देशाच्या इतिहासात मोलाची कामगिरी केली आहे.मात्र देशाचे अर्थकारण आजच्या इतके एका उद्योगसमूहाभोवती केंद्रीभूत झालेले नव्हते.

हिंडेंबर्ग रिपोर्ट व राहुल गांधींनी मोदी सरकारला संसदेत अनेक प्रश्न विचारले आहेत,त्याची उत्तरे सरकारने दिलेली नाहीत.नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून अदानी समुहाने विमानतळ, सिमेंट,तांबे उद्योग,रिफायनरी, डेटा सेंटर,ग्रीन हायड्रोजन, पेट्रोकेमिकल्स,रस्ते निर्माण आणि सौर उर्जा अशा क्षेत्रांमध्ये प्रचंड मोठी गुंतवणूक केली आहे.संपूर्ण जग कोरोना महामारीत ठप्प झाले होते.मात्र याच काळात अदानी उद्योगसमूहाची आर्थिक गती नजरेत भरणारी ठरली आहे.
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानाच मुंद्रा बंदराचे कंत्राट अदानी यांना मिळाले. उर्जा क्षेत्रातही त्यांचा जम बसला.नरेंद्र मोदींची औद्योगिक रणनिती अदानी उद्योगसमूहाला फायदेशीर ठरली आहे.

मागील काही वर्षात ३० अब्ज डॉलर्स कर्ज अदानी उद्योगसमूहाने उभे केले आहे.
हिंडेंबर्गच्या अहवालानुसार शेअरच्या किमती कृत्रिमरीत्या फुगवण्यात आल्या.ते शेअर तारण ठेवून स्टेट बँक,एलआयसी,सह सरकारी बँकांनी त्यांना सहज प्रचंड मोठी कर्जे उपलब्ध करून दिली आहेत.
संसदेत राहुल गांधी यांनी जे प्रश्न प्रश्न विचारले त्याची उत्तरे सरकार देऊ इच्छित नाही,हे स्पष्ट झाले आहे. गुजरात कोर्टाचा निकालाचा आधार घेऊन सरकारने राहुल गांधी यांचा संसदेतील प्रवेश रोखला आहे.राहुल गांधी दोन वर्षे तुरुंगात गेले तरी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकार देत नाही,याची चर्चा सुरू राहणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी कारवाई करत सुटले आहे.अपात्रता,तुरुंगवास किंवा धमक्यांना घाबरणार नाही, मोदी सरकारने केलेले गैरव्यवहारांवर बोलतच राहणार असल्याचं राहुल गांधी म्हणाले आहेत.गौतम अदानी यांचं पीएम नरेंद्र मोदी यांच्याशी काय नातं आहे? या एका प्रश्नाने राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना हैराण केले आहे.
बोफोर्स प्रकरणानंतर भारतीय राजकारण ढवळून गेले होते.आज देशातील राजकारण एका उद्योगसमूहाशी असलेल्या विशेष नात्यामुळे ढवळून निघाले आहे.

२०१४ मध्ये अदानी जगातील श्रीमंतांच्या यादीत ६०९ व्या क्रमांकावर होते.मात्र मोदी सरकारच्या काळात ते जगातील दोन नंबरचे श्रीमंत कसे झाले? त्यांच्या उद्योगसमूहात ८०० टक्क्यांनी वाढ कशी झाली? देशातील सर्व कंत्राटे अदानी यांना सहज कशी मिळाली? भारतीय बँका,एलआयसी,व सरकारी पेन्शन फंडाची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक अदानी उद्योगात करताना कोणी विचार का केला नाही.

ईडी,प्राप्तिकर सारख्या बलाढ्य तपास यंत्रणा देशभर आर्थिक शुद्धीकरण व भ्रष्टाचारमुक्त भारतासाठी २०१४ पासून धाडी घालत आहे.भाजपचे नेते सोडले तर विरोधी पक्षाच्या शेकडो लोकांवर केंद्रीय तपास यंत्रणानी कारवाया केल्या.परंतु या यंत्रणांनी अद्यापही अदानी उद्योगसमूहाकडे का दुर्लक्ष केले आहे.अदानी उद्योगसमूहाकडे गुंतवणुकीसाठी इतका पैसा येतो कुठून हा राहुल गांधी विचारलेला प्रश्न सरकारला धडकी भरवत आहे.

अदानी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले मात्र त्यांच्या विशाल औद्योगिक साम्राज्यात किती रोजगार निर्माण झाले आहेत.
भारतात सर्वात जास्त रोजगार सरकारी कंपन्यांमध्ये आजही आहेत.नामवंत नवरत्न कंपन्या सरकारच्या आहेत.टाटा उद्योगसमूहात किमान ९ लाख लोक आहेत.टाटा,बजाज,बिर्ला,गरवारे,किर्लोस्कर या समूहातील विविध कंपन्या व सरकारी उद्योगांनी या देशाच्या औद्योगिक प्रगतीमध्ये मोलाचा सहभाग दिला आहे.मात्र स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी काळात एका उद्योग समूहाभोवती २०१४ पासून देशाचे अर्थकारण फिरत आहे.त्यामुळे राहुल गांधी यांनी विचारलेले प्रश्न बोफोर्स तोफांच्या आवाजासारखे सरकारचे कानठळ्या बसवणार आहेत.

विशेष लेख-क्रांतिकुमार कडुलकर

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय