Friday, November 22, 2024
Homeआरोग्यधक्कादायक : विषबाधित रुग्णांना रस्त्यावर उपचार, सलाईनच्या बाटल्या टांगल्या दोरीला

धक्कादायक : विषबाधित रुग्णांना रस्त्यावर उपचार, सलाईनच्या बाटल्या टांगल्या दोरीला

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा येथे एका धार्मिक कार्यक्रमातील जेवणातून शेकडो लोकांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे सुमारे 300 रुग्णांवर उपचार करावे लागले. या रुग्णांवरील उपचारा वेळी मात्र आरोग्य व्यवस्था कोलमडून पडल्याचे चित्र दिसून आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या संख्येने लोक आजारी असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात या लोकांच्या उपचारासाठी योग्य व्यवस्था नसल्याचा आरोप रुग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. परिस्थिती अशी होती की, रुग्णालयाच्या आतही अनेक रुग्ण जमिनीवर पडून उपचार घेत होते. तर अनेक रुग्णांना रस्त्यावरच उपचार घ्यावे लागले.

विषबाधित रुग्णांवर उपचार करायला पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णांची अक्षम्य हेळसांड झाली. रुग्णांना रस्त्यावर आडवे केले आणि ग्लुकोजच्या बाटल्या दोरीच्या सहाय्याने लटकवल्या. रूग्णालयाबाहेरील रस्त्यावर उपचार घेत असलेल्या रूग्णांचे हे चित्र सध्या व्हायरल होत आहे. कोरोना महामारीतही रुग्णांची एवढी दयनीय अवस्था कधी झाली नव्हती. एवढी दयनी अवस्था बघायला मिळाली.

इतकेच नव्हे तर जेव्हा नातेवाइक पेशंटला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा तिथे डॉक्टरही उपलब्ध नव्हते. काही काळ तेथे डॉक्टर न आल्याने कुटुंबीयांना खासगी डॉक्टरांना बोलवावे लागले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेतील 30 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय