घोडेगाव : वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने भीमाशंकर अभयारण्य परिसरात पोखरी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील ४० विद्यार्थ्यांनी श्रमदानात सहभाग घेतला. यावेळी वृक्षरोपण करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. शशिकांत साळवे यांनी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच महात्मा गांधीजींचे कार्याचे महत्त्व सांगत गांधीजींचे विचार पुढे घेऊन जाणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. विलास रोंगटे तसेच प्रा. धनंजय भांगरे, प्रा. महेश गाडेकर, प्रा. विशाल पवार, प्रा.धनश्री कोळगेहे उपस्थित होते. तसेच फॉरेस्ट अधिकारी वसंत चव्हाण व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रममध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना वसंत चव्हाण यांनी वन्यजीव सप्ताहाचे महत्व सांगितले होते.