Tuesday, January 7, 2025
Homeराष्ट्रीयओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?

ओयो हॉटेल्सकडून नवी चेक-इन धोरण ; अविवाहित जोडपी अडचणीत ?

OYO Hotels New Policy : ट्रॅव्हल बुकिंग क्षेत्रातील एक प्रमुख नाव असलेल्या ओयो (OYO) हॉटेल्सने अविवाहित जोडप्यांसाठी नवी चेक-इन धोरण (OYO Check-In Policy) लागू केली आहे. या नव्या धोरणांतर्गत, ओयोच्या भागीदार हॉटेल्समध्ये राहणाऱ्या सर्व जोडप्यांना चेक-इन दरम्यान वैध नातेसंबंध सिद्ध करणारी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असेल. ही अट ऑनलाइन बुकिंगसाठीही लागू असणार आहे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ओयोच्या भागीदार हॉटेल्सना अविवाहित जोडप्यांना आरक्षण नाकारण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे अविवाहित जोडप्यांना हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला जाऊ शकतो, (OYO Hotels Policy For Unmarried Couples) परंतु हा निर्णय स्थानिक परिस्थिती आणि हॉटेल व्यवस्थापनाच्या धोरणावर अवलंबून असेल. सध्या या धोरणाची अंमलबजावणी फक्त मेरठ येथे करण्यात आली आहे, असे पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे.

भविष्यात या धोरणाचा विस्तार इतर शहरांमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मेरठमधील नागरी समाज गटांकडून मोठ्या प्रमाणावर मिळालेल्या अभिप्रायानंतर ओयोने हे पाऊल उचलले आहे.

ओयोचे उत्तर भारताचे प्रादेशिक प्रमुख पवास शर्मा यांनी या नव्या धोरणाबाबत निवेदन दिले आहे. त्यांनी कंपनीच्या सुरक्षित आणि जबाबदार आदरातिथ्याबाबत वचनबद्धतेवर भर दिला. ते म्हणाले, “ओयो वैयक्तिक स्वातंत्र्याचा आदर करत असताना, स्थानिक कायद्यांची अंमलबजावणी आणि नागरी समाज गटांशी सहकार्य करण्याची गरज आम्ही ओळखतो. धोरणाच्या परिणामांवर आमचे सतत लक्ष असेल आणि आवश्यकतेनुसार आम्ही सुधारणा करू.”

या धोरणामुळे ओयो हॉटेल्सच्या व्यवस्थापनातील धोरणात्मक बदल चर्चेचा विषय बनला आहे, तर याचा प्रवाशांवर काय परिणाम होतो, याकडेही लक्ष लागले आहे.

whatsapp link
google news gif

हे ही वाचा :

जगातील सर्वाधिक पगार घेतो ‘हा’ भारतीय वंशाचा माणूस, पगार ऐकून थक्क व्हाल

अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे निधन

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव

‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे सरकारने घेतले परत ? वाचा काय आहे प्रकरण !

चीनमध्ये पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूचा कहर, जगाची चिंता वाढली

मोठी बातमी : शेतकऱ्यांना मोठा दिलासा : ‘त्या’ जमिनी परत करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

नववर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कंडोमपासून आलू भुजियापर्यंत ऑनलाईन विक्रमी खरेदी, यादी एकदा वाचाच !

संबंधित लेख

लोकप्रिय