Wednesday, May 8, 2024
HomeNewsइंडोनेशियामध्ये फुटबॉल स्पर्धेत मृत्यूचा नंगा नाच, हिंसाचारात 200 जणांचा मृत्यू ;...

इंडोनेशियामध्ये फुटबॉल स्पर्धेत मृत्यूचा नंगा नाच, हिंसाचारात 200 जणांचा मृत्यू ; शेकडो जखमी !

इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात 207 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 160 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.एका संघाने सामना गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला.

दरम्यान, एएफपी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानावर हल्ला केला. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेने पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको आफिंटाच्या हवाल्याने सांगितले की, स्टेडियममध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला आणि बाकीचे रुग्णालयात मरण पावले.

इंडोनेशियामध्ये (Indonesia) पर्स्बाया सुराबायाने अरेमा एफसीकडून फुटबॉल सामना 3-2 ने असा जिंकला. त्यानंतर अरेमा एफसीचे हजारो चाहते मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरु केला. यानंतर स्थानिक पोलीस (Police) आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाचे कर्मचारीही मैदानात दाखल झाले आणि त्यांनी पर्स्बाया सुराबायाच्या खेळाडूंना संरक्षण दिले.

मैदानात सुरक्षा दले (Security Forces) आणि चाहते यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. यादरम्यान चाहत्यांनी सुरक्षा जवानांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी सुरक्षा दलाकडून अश्रूधुराचा वापर करण्यात आला.तसेच, पीटी लीगा इंडोनेशिया बारु (LIB) चे अध्यक्ष अखमद हादियान लुकिता यांनी इंडोनेशियातील या हिंसक घटनेवर सांगितले की, ‘आम्ही या घटनेबद्दल खूप चिंतित आहोत आणि मनापासून खेद व्यक्त करतो. आणि आशा करतो की हा आपल्या सर्वांसाठी एक धडा असेल.’

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय