Thursday, November 21, 2024
Homeजिल्हाअनंतराव पवार महाविद्यालयात प्लास्टिक संकलन उपक्रमाचे आयोजन

अनंतराव पवार महाविद्यालयात प्लास्टिक संकलन उपक्रमाचे आयोजन

पिरंगूट / दिपाली पवळे-आंग्रे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अनंतराव पवार महाविद्यालय, पिरंगुट (Anantrao Pawar College) येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्लास्टिक संकलन उपक्रम विशेषत्वाने आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अंकुश मोरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष) उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अभय खंडागळे हे होते. तसेच या कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Anantrao Pawar College)

महाविद्यालयात अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजे दर महिन्याच्या २२ तारखेला दरमहा ‘प्लास्टिक संकलन उपक्रम’ राबविण्यात येतो. यामध्ये आपल्या घरातील, परिसरातील, महाविद्यालयाच्या आवारातील प्लास्टिक संकलन केले जाते. यावेळीही वाढदिवसाचे औचित्य साधून सदर उपक्रम घेण्यात आला. या प्लास्टिक संकलन उपक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी यांनी आपल्या घरातील, परिसरातील प्लास्टिक संकलन करून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी प्लास्टिक मुक्त राहण्याचा निर्धार केला.

कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. मीनाली चव्हाण यांनी काम पाहिले. उपक्रमासाठी प्राध्यापक, प्रशासकीय सेवक यांनी सहकार्य केले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

ब्रेकिंग : अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड

मोठी बातमी : अर्थसंकल्पात सोने-चांदीच्या दरात मोठी कपात, वाचा किती झाले कमी !

मोठी बातमी : मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

ब्रेकिंग : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी : MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापकासह विविध पदांसाठी मुलाखत

मोठी बातमी : संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर, वाचा अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा !

ब्रेकिंग : अर्थसंकल्पानंतर शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड

गुजरातमधील शाळेच्या पहिल्या मजल्यावरील भिंत कोसळली, धक्कादायक व्हिडिओ समोर

संबंधित लेख

लोकप्रिय