Saturday, February 8, 2025

स्वराज ग्लोबल स्कूल मध्ये स्वातंत्र्यदिनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी चिंचवड / क्रांतिकुमार कडुलकर : चिखली नेवाळे वस्ती येथील स्वराज्य ग्लोबल स्कुल मध्ये स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून विशेष सांकृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण लहान मुलांनी केले. 

स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस,भगतसिंग आदी प्रमुख नेते आणि क्रांतिकारकांच्या वेशभूषा परिधान करून स्वातंत्र्य गीतावर नृत्य सादरीकरण करणाऱ्या लहान मुलांनी अभिनव पद्धतीने स्वातंत्र्यदिन साजरा केला.

यावेळी मुलींनी भारतमातेची तसेच सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा करून स्वातंत्र्य लढाईतील महिलांच्या योगदानाचे  सादरीकरण केले. काही मुलांनी पोलीस अधिकारी व सैनिकांच्या वेशभूषेत प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक संतोष डोलारे, डॉ.मनीषा दुर्गुडे, शास्त्रज्ञ किरण यादव, इंजिनिअर प्रज्ञा मॅडम यांना  अभिवादन केले.

लहान मुलांना स्वातंत्र्यदिनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वातंत्र्याच्या दैदिप्यमान लढ्यातील संघर्ष आणि त्यागाची माहिती दिली जाते, नव्या पिढीला इतिहास माहीत नाही, त्यामुळे स्वातंत्रदिनाची सुटी पर्यटन म्हणून समजली जाते. नर्सरीतील मुलांना देशाच्या इतिहासातील किमान माहिती स्वातंत्र्यदिनी सांकृतिक कार्यक्रमातून द्यावी, तसेच आधुनिक शिक्षणाबरोबर सांस्कृतिक वारसा जपला जावा, यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो,असे स्वराज ग्लोबल स्कुलच्या संचालिका माही चौरे मॅडम यांनी स्वागतपर भाषणात सांगितले.

यावेळी पोलीस निरीक्षक संतोष डोलारे यांनी शाळा व्यवस्थापनाचे कौतूक केले. त्यांच्या हस्ते मुलांना बक्षिसे व खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे संयोजन टीचर राणी माळी, देविका भिंगारदिवे, मेघा पाटील, सुरेखा मोटगी, सिस्टर सारिका हजारे यांनी केले.

LIC
Lic

Related Articles

- Advertisement -

Latest Articles