Saturday, May 18, 2024
Homeनोकरीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सेवेची संधी.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सेवेची संधी.

शासकीय / निमशासकीय सेवेतून रुपये ४८०० / – ग्रेड पेक्षा कमी ग्रेड पे घेऊन गट – ब ( राजपत्रित व अराजपत्रित ) या संवर्गातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने लेखा व प्रशासकीय क्षेत्रातील विवक्षित कामासाठी नामिकासूची करण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे.


■  विवक्षित सेवा / कामाचे स्वरुप :

१. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना यांच्याशी संबंधीत लेखाविषयक कामकाज.

● अर्हता व अनुभव –  लेखाविषयक कामकाजाचा तसेच रोखपाल वा समकक्ष म्हणून गट – ब ( राजपत्रित व अराजपत्रित ) या संवर्गीय शासन सेवेतील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे . 

● वयोमर्यादा – ५८ ते ६२ वर्षापर्यंत .

● पदसंख्या – १

२. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी / आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान | योजना याबाबत आस्थापनाविषयक कामकाज .

● अर्हता व कामाचा अनुभव – प्रशासकीय अधिकारी / कार्यालयीन अधिक्षक वा समकक्ष पदाचा ( लेखा व प्रशासकीय ) गट – ब ( राजपत्रित व अराजपत्रित ) या संवर्गीय शासन सेवेतील किमान ५ वर्षांचा अनुभव.

● वयोमर्यादा – ५८ ते ६२ वर्षापर्यंत . 

● पदसंख्या – १

शासन निर्णय , सामान्य प्रशासन विभाग , क्रमांक – संकीर्ण -२७१५ / प्र.क्र .१०० / १३ , दिनांक १७.१२.२०१६ नुसार नियुक्ती करण्यात येईल . नियुक्तीनंतर अनुज्ञेय असलेले आर्थिक लाभ देण्यात येतील. 

इच्छुक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी त्यांचे अर्ज , आवश्यक त्या शैक्षणिक अर्हता व अनुभवाच्या प्रमाणपत्रासह महासंचालक यांच्या नावे उपरोक्त नमूद पत्त्यावर दिनांक २५ सप्टेंबर, २०२० रोजी दुपारी ३.०० वा. पर्यंत सादर करावेत . 

● पत्ता – महाराष्ट्र शासन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई वृत्त शाखा, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग , मंत्रालय, मुंबई -४०० ०३२. दूरध्वनी क्रमांक – ०२२-२२८२१५६६

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय