Sunday, May 5, 2024
Homeग्रामीण९ ऑगस्ट क्रांती दिनी आडम मास्तर व अँड.एम.एच. शेख यांच्यासह ५०० कार्यकर्ते...

९ ऑगस्ट क्रांती दिनी आडम मास्तर व अँड.एम.एच. शेख यांच्यासह ५०० कार्यकर्ते अटक व १०० कार्यकर्ते लाठीमारमध्ये जखमी.

सोलापूर : ९ ऑगस्ट १९४२ रोजी इंग्रज सरकार चलेजाव या राष्ट्रीय उठावा मुळे समस्त भारतीयांच्या मनामनात आणि रक्ताच्या कणाकणात पूर्ण स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली आणि जुलमी इंग्रज राजवट भारतीय जनतेने पायदळी तुडवून स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलेल्या भूमिपुत्रांच्या त्यागाचा दीपस्तंभ उभारले. ती ऑगस्ट क्रांती जगावर अजरामर झाली. त्या दिवसाची स्फूर्ती घेऊन प्रस्तुत मोदी सरकारच्या जनता विरोधी, कामगार विरोधी धोरणापासून वाचवण्यासाठी आज देशव्यापी भारत बचाव आंदोलना ची केंद्रीय कामगार संघटनांनी घोषणा दिली. 

प्रामुख्याने ताळेबंदीच्या काळातील संपूर्ण वीज बिल सरसकट माफ करावे,तसेच बिडी, यंत्रमाग, असंघटीत कामगार,ऑटो रिक्षा चालक यांनी राज्यसरकार कडे ताळेबंदी च्या काळात आर्थिक मदत मिळण्या करिता १ लाख कामगारांनी अर्ज दाखल केले ते अनुदान तातडीने अदा करणे सरकार ला क्रमप्राप्त असल्याचे ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी सांगितले. पोलिसांनी आंदोलन मोडून काढण्यासाठी संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले. वार्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांना हाकलून लावले. मा.जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळ भेटण्यासाठी मज्जाव केले.तात्काळ अटक सत्र सुरू केले याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केले.याबाबत मा.राज्यपाल मा.मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री,पोलीस महासंचालक यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याची माहिती दिली. 

आज ९ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी प्रतिगामी धोरणे आणि जनता विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर सिटू चे राज्य महासचिव अँड एम. एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध न्याय हक्काच्या मागण्या घेऊन संपूर्ण जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालण्याची तयारी केली होती. मात्र पोलीस प्रशासन आंदोलन दडपुन टाकण्यासाठी आंदोलकांवर लाठी उगारली.पांगापांग केले. जवळजवळ हजारो आंदोलकांना हुसकवले. पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्व सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कडक नाकाबंदी व कामगारांना परतून लावण्याचा केविलवाणा प्रयत्न पोलिसांकडून झाला. प्रामुख्याने एम. आय. डी. सी. , जेलरोड, सदर बझार, पोलीस मुख्यालय याठिकाणी आडम मास्तर यांच्यासह असे एकूण ५०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. १०० कार्यकर्ते लाठीमार मध्ये जखमी झाले. ग्रामीण भागात कुंभारी गोदूताई वसाहत येथे ८ हजार आंदोलकांवर दडपशाही करून कडक नाकाबंदी केले. तरीही लोक आक्रमक व उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी होऊन सरकार विरुद्धचा संताप व्यक्त केले.  

यावेळी आडम पुढे बोलताना म्हणाले की, सरकार अन्नधान्य वितरण केल्याचे सांगून जनतेची दिशाभूल करीत आहेत आजही कोट्यवधी लोक उपासमारीने तडफडत आहेत.अन्नापासून वंचित आहेत.रास्तधान्य वितरणात मोठ्या प्रमाणात काळाबाजार झालेला आहे.गोदामात लाखोटन धान्य उंदीर घुशी खात आहेत.अन्न सडत आहे.परंतु देशवासियांना द्यायला सरकार तयार नाहीत याहून दुसरे दुर्दैव असू शकत नाही.आज पोलीस प्रशासन आंदोलन दडपून टाकले पण अल्पावधीतच याहून उग्र आंदोलन करण्याचा जाहीर इशारा दिला.तेव्हा कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सरकार आणि प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी, असेही ते म्हणाले.  

यावेळी कॉ नरसय्या आडम मास्तर, नलिनी कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी,युसूफ मेजर, मशप्पा विटे,दाऊद शेख, अशोक बल्ला, दीपक निकंबे, अनिल वासम, मोहन कोक्कुल यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदर आंदोलनात माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, सिद्धपा कलशेट्टी,व्यंकटेश कोंगारी,युसूफ मेजर, अब्राहम कुमार, म.हानिफ सातखेड, रंगप्पा मरेड्डी,  सलीम मुल्ला, मुरलीधर सुंचू, दाऊद शेख,जावेद सगरी,अनिल वासम, अशोक बल्ला,दीपक निकंबे, दत्ता चव्हाण,अकील शेख,आसिफ पठाण, इलियास सिद्दीकी,शकुंतला पानिभाते, शंकर म्हेत्रे,नरेश दुगाणे,किशोर मेहता,बाबू कोकणे, शहाबुद्दीन शेख, श्रीनिवास गड्डाम, सिद्धाराम उमराणी, सलिम पटेल,पुष्पा पाटील बंडू सगर, लिंगव्वा सोलापूरे अमित मंचले, श्रीकांत कांबळे, विल्यम ससाणे, बापू साबळे, फातिमा बेग, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, अप्पाशा चांगले, सनातन म्हेत्रे, वसीम देशमुख, हसन शेख,प्रभाकर गेंत्याल, सायाना  मदगल, विजय हरसुरे, महिबूब गिरगावकर, कादर शेख, राजू गड्डाम, जब्बार मोमीन, हृषीकेश कटके, गिरीराज कलशेट्टी, चंद्रकांत गोण्याल अफसर शेख सरफराज शेख, मेनुद्दीन मनुयार गोदूताई वसाहतीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय