Thursday, April 25, 2024
Homeग्रामीणरामटेक येथे केंद्र सरकारच्या विरोधात विविध संघटनांच्या वतीने निदर्शने.

रामटेक येथे केंद्र सरकारच्या विरोधात विविध संघटनांच्या वतीने निदर्शने.

रामटेक : रामटेक येथे केंद्र सरकारच्या विरोधात विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

आज ९ ऑगस्ट, क्रांंती दिनी १९४२ ला इंग्रजो भारत छोडो असा नारा दिला गेला होता. ७८ वर्षानंतर पुन्हा आजच्या दिवशी देशातील अनेक शेतकरी संघटनांनी मिळून, ” कॉर्पोरेट भारत छोडो ” असा नारा देत देशव्यापी आंदोलनाचा कॉल दिला. सोबतच अनेक कामगार, युवा आणि विद्यार्थी संघटना देखील ह्या आंदोलनात सहभागी होणार होते. ह्याच देशव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून रामटेक येथे संघटनेचा कार्यलायातूनच अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेंड युनियन व एस एफ आय ने संयुक्तरिता निदर्शन केले. 

सार्वजनिक क्षेत्राचे खाजगीकरण बंद करा, डिझेल-पेट्रोल ची भाववाढ मागे घ्या, शेतकऱ्यांना मारक असणारे अध्यादेश मागे घ्या, शेतमालाला हमीभाव द्या, आशा व गटपर्वतक कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील केंद्रीकरण, खाजगीकरण, बाजारीकरनाला वाव देणाऱ्या बाबी काढून टाका व संसदेत चर्चेसाठी ठेवा इत्यादी प्रमुख मागण्या या आंदोलनाच्या होत्या.

आंदोलनात किसान सभेचे राजू हटवार, गौराबाई माकडे, गणेश महाजन, भीमराव गोंडाने,  सिटू चे गौतम नाईक, कल्पना हटवार व एसएफआय चे अमित हटवार, संदेश रामटेके व संघर्ष हटवार इत्यादी सह कार्यकर्ते सामील झाले होते.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय