Friday, May 3, 2024
Homeजिल्हा'मोदी' आडनावावरून टिपण्णीमुळे ओबीसी समाजाचा अवमान

‘मोदी’ आडनावावरून टिपण्णीमुळे ओबीसी समाजाचा अवमान

काँग्रेस नेते राहुल गांधींची मानसिकता तर राजेशाही-घराणेशाहीची!

पिंपरी- चिंचवड भाजपातर्फे जोरदार निदर्शने

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर
:
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ”मोदी ” या आडनावावरून अपमानास्पद टिप्पण्णी करताना ओबीसी समाजाचा आणि या समाजाचा भाग असलेल्या तेली समाजबांधवांचा अपमान केला. न्यायालयाने या बद्दल राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. राहुल गांधी हे आपल्या घराण्यामुळे आलेल्या राजेशाही मानसिकतेततून बाहेर पडले नाहीत असेच त्यांच्या वक्तव्यावरून दिसते, अशी टीका भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.
‘मोदी’ आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान केल्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधात पिंपरी- चिंचवड भाजपातर्फे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, माजी नगरसेवक सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, राजेंद्र लांडगे, संगीता भोंडवे, अश्विनी चिंचवडे, शर्मिला बाबर, पश्चिम महाराष्ट्र ओबीसी मोर्चा संपर्क प्रमुख वीणा सोनवलकर, प्रकाश जवळकर, समीर जावळकर, देंवदत्त लांडे, निखिल काळकुटे, कविता हिंगे, कोमल शिंदे, महादेव कवितके, विजय शिनकर, धनंजय शाळीग्राम, सुभाष सरोदे, फारूक इनामदार, योगेश चिंचवडे, नंदू दाभाडे, माणिक फडतरे,नंदू कदम, विनायक गायकवाड,महेंद्र बाविस्कर,किसन बावकर,संतोष मोरे,मुकेश चुडासमा,देविदास पाटील,गणेश वाळुंजकर, बाळासाहेब भुंबे आदी उपस्थित होते.

सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, नामदेव ढाके, अमित गोरखे, वीणा सोनवलकर, सदाशिव खाडे यांनी आपल्या भाषणात तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

सदाशिव खाडे म्हणाले की, ‘मोदी’ या आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी राज्यभर आंदोलन करणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात भाष्य करणारे काँग्रेसचे नेते न्यायालयाने राहुल गांधी यांना कोणत्या कारणाबद्दल दोषी ठरवले आहे याबद्दल काहीच बोलत नाहीत.
भाजपा ओबीसी मोर्चा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख वीना सोनवलकर म्हणाल्या की, न्यायालयाने दिलेली शिक्षा मान्य करण्याच्या ऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलने करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत आहेत. काँग्रेस नेत्यांनी लन्यायालयाचा अवमान केल्याबद्दल भाजपा न्यायालयात दाद मागेल, असेही ते म्हणाले.

अवमान करणाऱ्या विरोधात दाद मागण्याचा प्रत्येकाला अधिकार


संघटन सरचिटणीस अमोल थोरात म्हणाले की, “सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे काय असते” , असे वक्तव्य राहुल गांधींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील प्रचारसभेत बोलताना केले होते. मोदी या आडनावाच्या अनेक व्यक्ती क्रीडापटू आहेत. डॉक्टर आहेत. इंजिनीअर आहेत. व्यावसायिक आहेत. एखाद्या आडनावाशी संबंधित लोकांचा एखादी व्यक्ती जाहीर सभेत अपमान करत असेल, तर त्या विशिष्ट आडनावाच्या व्यक्तींना मानहानीचा दावा दाखल करण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे. आपण कोणालाही अपमानित करावे हा आपला अधिकार आहे असे राहुल गांधींना वाटत असेल, तर त्यांच्या वक्तव्यामुळे अपमानित झालेल्या व्यक्तीला त्याविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय