Saturday, April 20, 2024
Homeआंबेगावउपोषणाच्या दुसऱ्या दिवशी 'एसएफआय' चा प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव; सर्व मागण्या मान्य.. 

उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी ‘एसएफआय’ चा प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव; सर्व मागण्या मान्य.. 

घोडेगाव : स्टुडंट्स फेडारेशन ऑफ इंडिया (SFI) पुणे जिल्हा समितीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगाव येथे दि.23 मार्च पासून बेमुदत उपोषण सुरू होते. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत ठोस निर्णय न झाल्याने विद्यार्थ्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या केबीन बाहेर घेराव करून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांनतर प्रकल्प अधिकारी व सबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी तब्बल चार तास चाललेल्या तिसऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन. महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.. व रात्री 12 वाजता प्रकल्प अधिकारी मा. बळवंत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या समोर सर्व मागण्या मान्य झाल्याचा व अमलबजावणीला सुरुवात केल्याचा निर्णय कळवला.

On the second day of the fast, 'SFI' project officials besieged; All demands accepted..

अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार, अनेक दिवसांची थकीत DBT विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झाली, थकीत मासिक निर्वाहभत्ते विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र 1 एप्रिल 2023 पासून सुरु होणार, जुन्नर मध्ये होऊ घातलेले नवीन शासकीय वसतिगृह येथील रस्त्याचा प्रश्न नवीन शैक्षणिक वर्ष चालू होण्याच्या अगोदर सोडविण्याचा निर्णय झाला, MS-CIT, Typing, TALLY, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण व ईतर कोर्सेस वसतिगृह व इतर सर्व विद्यार्थ्यांसाठी चालू करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठविण्यात येणार आहे, तसेच यापुढे महाविद्यालय प्रवेश हा शून्य रूपया मध्ये होणार आहे. भत्ता व डीबीटी वाढीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयास पाठवला आहे, स्वयंम डीबीटी संदर्भात वरिष्ठ कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात येणार आहे, वसतिगृहे, आश्रमशाळा येथे विविध पदे भरण्याविषयी कार्यवाही करणार, वसतिगृह व आश्रमशाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी उपायोजना करण्यात येणार, प्रत्येक दोन महिन्यातून प्रकल्प प्रशासन, वसतिगृह गृहापाल, आश्रमशाळा मुख्यध्यपक, अधीक्षक, SFI चे प्रतिनिधी व विद्यार्थी यांची संयुक्त बैठक घेण्याचा निर्णय झाला, या मागण्यांवर अंमलबजावणी सुरू करण्यास प्रशासनास भाग पाडले.

On the second day of the fast, 'SFI' project officials besieged; All demands accepted..

उपोषणास एस एफ आय चे जिल्हाध्यक्ष अविनाश गवारी, जिल्हा कमिटी सदस्य राजू शेळके जिल्हा कमिटी सदस्य रोशन पेकारी, जिल्हा कोषाध्यक्ष बाळकृष्ण गवारी बसले होते…त्यांनी या निर्णयानंतर सर्वानुमते उपोषण मागे घेतले.

यावेळी एसएफआय चे राज्य अध्यक्ष सोमनाथ निर्मळ, राज्य सचिव विलास साबळे, जिल्हा सचिव नवनाथ मोरे, राज्य कमिटी सदस्या संदिप मरभळ, रूपाली खमसे, जिल्हा सहसचिव प्रविण गवारी, आंबेगाव तालुका अध्यक्ष दिपक वाळकोळी, जुन्नर तालुका अध्यक्ष अक्षय साबळे, सचिव अक्षय घोडे, जिल्हा कमिटी सदस्य योगेश हिले, रोहिदास फलके, निशा साबळे, भूषण पोफळे, कांचन साबळे, शितल भवारी, वैशाली मुंढे, दिपक बगाड, सुरज बांबळे, विकास बांबळे, विशाल भवारी तसेच किसान सभेचे जुन्नर तालुका सचिव लक्ष्मण जोशी, उपाध्यक्ष मुकुंद घोडे, संदिप शेळकंदे, डीवायएफआय चे तालुका अध्यक्ष गणपत घोडे, किरण हिले, दिपक लाडके आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय