Sunday, March 16, 2025

रंगीत बटाट्याचे नवे वाण विकसित, रोगप्रतिकारक क्षमताही वाढणार, बघा काय आहे खासियत

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

भोपाळ : देश-विदेशात वेगवेगळ्या भाज्यावर संशोधन केले जाते,  त्यांची नवीन प्रजातीही विकसित केली जाते.  आता संशोधकांनी चक्क बटाट्याच्या रंगरूपातही बदल केला आहे. आता बटाटे रंगीबेरंगी बघायला मिळणार आहे.

ग्वाल्हेरमधील आलू अनुसंधान केंद्रात संशोधकांनी संशोधन करून रंगीत बटाट्याची नवी प्रजाती विकसित केली आहे. हा बटाटा खास कोरोना काळात हा रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकणारा आहे. त्यामध्ये झिंक, आयर्न आणि कॅटरिन हे घटक मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे या बटाट्याचे सेवन केल्यास रक्ताच्या कमतरतेची समस्या कमी होईल आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढून कोरोनाशी चांगला मुकाबला करता येऊ शकतो असा दावा वैज्ञानिकांचा केला आहे. 

या बटाट्यांचा बाह्यच नव्हे तर आतील भागही रंगीत असणार आहे. या बटाट्याचे नुकतेच नवे वाण विकसित केले असून लवकरच ते शेतकर्यांाना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे रंगीत बटाटे लोकांना अधिक आकर्षित करतील.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles