|
Photo : Facebook |
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज सकाळी निधन झाले. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनिया झाला होता. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच क्रँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांची प्राणज्योत मावळली.
लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्कवर संध्याकाळी 6: 30 वाजता अंत्यसंस्कार होणार आहे. यांच्या अंत्यदर्शनासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येणार आहेत. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे मोदींनी गोव्यातील आभासी (व्हर्चुअल) सभा रद्द केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 4:30 पर्यंत मुंबईत दाखल होणार आहेत. आणि लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहणार आहे.
दरम्यान, लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटर वरून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.