Electricity Bill : आता लाईट बिल भरण्यासाठी इतरत्र जाण्याचा गरज पडणार नाही. आपण घरबसल्या लाईट बिल भरू शकतो. यासाठी आपल्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. आपल्याला स्मार्टफोन च्या माध्यमातून आपण आपले लाईट बिल भरू शकतो Light Bill
● फोन पे द्वारे बिल भरा :
▪️ सर्वात प्रथम PhonePe अॅप उघडल्यावर इलेक्ट्रिसिटी पर्यायावर क्लिक करा.
▪️तुम्ही इलेक्ट्रिसिटी या पर्यायावर क्लिक केल्यास तुम्हाला वीज पुरवठादार कंपनीचे नाव दिसेल.
▪️आता तुम्हाला तुमच्या वीज पुरवठादार कंपनीच्या नावावर क्लिक करावे लागेल.
▪️ क्लिक केल्यानंतर तुमचा ग्राहक क्रमांक विचारला जाईल. त्यानंतर तुम्हाला तुमचा ग्राहक क्रमांक टाकावा लागेल आणि त्यानंतर वीज बिल भरावे लागेल.
● गुगल पे च्या मदतीने बिल भरा :
▪️सर्वात प्रथम Google Pay अॅप उघडल्यावर New Payment वर क्लिक करा.
▪️यामध्ये तुम्हाला बिल पेमेंटचा पर्याय मिळेल.
▪️यानंतर वीज बिल पर्यायावर क्लिक करा आणि बिलासाठी एजन्सी निवडा. यानंतर ग्राहक खाते लिंक करा.
▪️ आता तुम्हाला विजेची रक्कम लिहावी लागेल आणि UPI पिन टाकून पेमेंट पूर्ण करावे लागेल.
● पेटीएम द्वारे बिल भरा :
▪️ पेटीएम अॅप उघडल्यावर वीज बिल पर्याय निवडा.
▪️यानंतर विद्युत मंडळाची निवड करा. आता ग्राहक क्रमांक माहिती भरा.
▪️ यानंतर तुम्हाला Get Bill पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि यामध्ये तुम्हाला तुमच्या बिलाची संपूर्ण माहिती दिसेल.
▪️ यानंतर तुम्हाला वीज बिल भरण्यासाठी फास्ट फॉरवर्ड वर क्लिक करावे लागेल आणि बिल भरण्यासाठी UPI पिन टाकावा लागेल.
▪️यानंतर तुम्ही Proceed To Pay वर क्लिक करताच तुमचे वीज बिल जमा होईल.
▪️ अशाप्रकारे तुम्ही Paytm द्वारे बिल भरू शकता.